शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीदरम्यान कोरोनाविषयक सुचनांचे पालन करा-डॉ. राजेंद्र भारुड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:20 IST

बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपजिल्हाधिकारी बालाजी क्षीरसागर, बबन ...

बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपजिल्हाधिकारी बालाजी क्षीरसागर, बबन काकडे, उपविभागीय अधिकारी शाहूराज मोरे, चेतन गिरासे, महेश सुधाळकर आदी उपस्थित होते.

यावेळी डॉ. भारुड यांनी जिल्ह्यातील मंगल कार्यालय आणि सभागृह मालकांच्या बैठका घेण्यात याव्यात. कोणत्याही राजकीय बैठकीत किंवा सभेत ५० पेक्षा अधिक व्यक्ती असणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन त्यांना याबाबत माहिती देण्यात यावी. मतदान आणि मतमोजणीच्यावेळीदेखील गर्दी होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांचे तापमान मोजण्याची आणि सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात यावी. कोरोनाच्या अनुषंगाने आवश्यक व्यवस्था करण्यासाठी समन्वयक आरोग्य अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी. निवडणूक क्षेत्रातील अधिकाधिक नागरिकांचे लसीकरण करण्याचा प्रयत्न करावा. मतदान व मतमोजणीसाठी नियुक्त प्रत्येक कर्मचाऱ्याने किमान लसीचा एक डोस घेतला असेल, याची खात्री करावी. संपूर्ण निवडणुकीदरम्यान निवडणूक आचारसंहितेचे कटाक्षाने पालन होईल याकडे लक्ष द्यावे. मतदान केंद्राची पाहणी करून पावसाच्या अनुषंगाने आवश्यक व्यवस्था करण्यात यावी. मतदान कर्मचाऱ्यांचे आवश्यक प्रशिक्षण घेण्यात यावे. मतदान केंद्रावरील आवश्यक सुविधांचा आढावा घेण्यात यावा व आवश्यक दुरुस्ती करण्यात यावी. महिला मतदान केंद्र आणि आदर्श मतदान केंद्र निश्चित करावे व मतदार सहाय्य केंद्र स्थापित करावे, आदी सूचना केल्या.

यावेळी पेड न्यूज समिती, संनियंत्रण समिती, शस्त्र जमा करणे आदी विविध विषयांचा आढावा घेण्यात आला. निवडणूकविषयी विविध परवानग्या देण्यासाठी एक खिडकी योजना राबवावी व आचारसंहिता कक्षाची स्थापना करावी, असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. जिल्ह्यातील ११ गट आणि १४ निर्वाचक गणांसाठी पोटनिवडणूक होणार आहे.

अक्कलकुवा तालुक्यात २ गट आणि एक गण, शहादा ४ गट आणि ८ गण तर नंदुरबार तालुक्यात प्रत्येकी ५ गट व निर्वाचक गण आहेत. अक्कलकुवा तालुक्यातील ३४, शहादा १८६ आणि नंदुरबार तालुक्यातील २३६ अशा एकूण ४५६ मतदान केंद्रांवर २ लाख ८२ हजार ३८७ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. यापैकी १ लाख ३९ हजार ५४८ स्त्री आणि १ लाख ४२ हजार ८३९ पुरुष मतदार असल्याची माहिती देण्यात आली. बैठकीस तिन्ही तालुक्यांचे तहसीलदार, गट विकास अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.