शहाद्यात पाच तर अक्कलकुव्यात एकाला कोरोना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 16:16 IST2020-04-29T16:16:01+5:302020-04-29T16:16:08+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १७ झाली आहे़ सकाळी दोघांचे तर रात्री उशिरा चार जणांचे ...

Five in Shahada and one in Akkalkuva | शहाद्यात पाच तर अक्कलकुव्यात एकाला कोरोना

शहाद्यात पाच तर अक्कलकुव्यात एकाला कोरोना

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १७ झाली आहे़ सकाळी दोघांचे तर रात्री उशिरा चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत़ यात पाच शहादा तर एक बाधित अक्कलकुवा येथील आहे़ रुग्ण संख्येत वाढ झाल्याने नंदुरबार जिल्हा रेड झोनमध्ये समाविष्ट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे़
मंगळवारी सकाळी धुळे येथून ५३ जणांचे अहवाल प्राप्त झाले होते़ यात ५१ नेगेटिव्ह तर शहादा येथील कोरोनाबाधिताच्या संपर्कात आलेली १५ वर्षीय मुलगी तर अक्कलकुवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे ५८ वर्षीय चालक यांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले होते़ दिवसभर याची चर्चा असताना रात्री उशिरा धुळे येथून ५२ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला होता़ यातील शहादा शहरातील एकाच कुटूंबातील चौघांचा अहवाल पॉझिटिव्ह तर ४८ स्वॅब रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत़ शहाद्यातील चौघांना कोरोनाची बाधा झाल्याने जिल्ह्यात बाधितांची संख्या आता १७ झाली आहे़ बाधितांमध्ये ४४, ४८ आणि ६५ वर्षीय पुरुष आणि १२ वर्षांच्या मुलीचा समावेश आहे़ त्यांना आयसोयलेशन वॉर्डात दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे़
दरम्यान त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सुरु झाला आहे़ शहाद्यातील कोरोनाची बाधा १५ वर्षीय मुलीला यापूर्वीच जिल्हा रुग्णालयाच्या आयसोलेशन कक्षात दाखल करण्यात आले आहे़ तर आरोग्य विभागाच्या अँब्युलन्स चालकालाही मंगळवारी अक्कलकुवा येथून नंदुरबार येथील आयसोलेशन वॉर्डात दाखल करण्यात आले़ अँब्युलन्स चालकाने कोरोनाबाधित महिलेला जिल्हा रुग्णालयात आणले होते़ यातून त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे़ त्यांच्या संपर्कात तब्बल २४ लोक आले आहेत़ त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे़ शहादा येथील युवतीच्या संपर्कातील सहा जण आधीपासून क्वारंटाईन आहेत़

Web Title: Five in Shahada and one in Akkalkuva