कॉपी पुरविणाऱ्या २४ जणांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 12:02 IST2020-03-05T12:02:15+5:302020-03-05T12:02:34+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दहावी परीक्षेच्या मंगळवारी झालेल्या पहिल्या पेपरला बाहेरून कॉपी पुरविणाºया व मनाई आदेशाचे उल्लंघन करणाºया ...

Five persons who provided the copy were charged | कॉपी पुरविणाऱ्या २४ जणांवर गुन्हा दाखल

कॉपी पुरविणाऱ्या २४ जणांवर गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : दहावी परीक्षेच्या मंगळवारी झालेल्या पहिल्या पेपरला बाहेरून कॉपी पुरविणाºया व मनाई आदेशाचे उल्लंघन करणाºया २४ जणांवर जिल्हाभरात कारवाई करण्यात आली.
दहावीच्या परीक्षेसाठी परीक्षा केंद्र परिसरात मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. त्याचे उल्लंघन करून अनेकजण बाहेरून कॉपी पुरवितात. अशा २४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
यात नंदुरबारातील दोन परीक्षा केंद्र, कोठली येथील एक केंद्र, नवापूरातील दोन केंद्र, अक्कलकुवा, तळोदा, शिर्वे या केंद्रावर बाहेरून कॉपी पुरविणाऱ्यांचा त्यात समावेश आहे.
यानंतरही ही मोहिम सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Five persons who provided the copy were charged