शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
5
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
6
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
7
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
8
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
9
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
10
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
11
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
12
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
13
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
14
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
15
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
16
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
17
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
18
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
19
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
20
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातच्या बेपर्वाईने महाराष्ट्रातील पाच लाख कोंबड्यांना धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:38 IST

नंदुरबार : महाराष्ट्र प्रशासनाने बर्ड फ्लू बाबत गुजरात प्रशासनाला सतर्क करुनही त्याची तात्काळ दखल न घेतल्याने आता त्याचा संभाव्य ...

नंदुरबार : महाराष्ट्र प्रशासनाने बर्ड फ्लू बाबत गुजरात प्रशासनाला सतर्क करुनही त्याची तात्काळ दखल न घेतल्याने आता त्याचा संभाव्य धोक्यापासून महाराष्ट्राला सतर्क राहावे लागणार आहे. सीमेलगतच्या पाच पाेल्ट्रींचा अहवाल निगेटिव्ह आला असला तरी गुजरातच्या हद्दीतील पोल्ट्रींचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सुमारे पाच लाख कोंबड्यांना त्याचा धोका निर्माण झाला आहे.महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेलगत माेठ्या प्रमाणावर पोल्ट्री व्यवसाय चालतो. या दोन्ही राज्यात तीन किलोमीटरच्या परिसरात ३० पेक्षाही अधिक पोल्ट्री असून, त्यात महाराष्ट्राच्या हद्दीतील २७ आहेत. तर गुजरातच्या हद्दीत तीन आहे. पोल्ट्रीमध्ये कोंबड्यांच्या अचानक मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याचे लक्षात येताच महाराष्ट्र प्रशासन सतर्क झाले व उपाययोजना सुरू केल्या. नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले. त्याचे अहवाल पॉझिटिव्ह येताच तात्काळ कोंबड्या व अंडी शास्त्राेक्त पद्धतीने नष्ट करण्यास सुरूवात केली. त्यासाठी विविध जिल्ह्यातील सुमारे ३०० पथक कार्यरत होते. हा अहवाल ज्या दिवशी मिळाला त्याच दिवशी जिल्हा प्रशासनाने शेजारील डांग व तापी जिल्हा प्रशासनाला कळवून सतर्कतेबाबत सूचना केल्या होत्या. मात्र गुजरात प्रशासनाने सुरूवातीला बेपर्वाईची भूमिका घेतली. एवढेच नव्हे तर गुजरातमधील पोल्ट्री फार्ममधून पक्षांची ने-आण होऊ नये याची खबरदारी घेण्यासाठी तेथील पोल्ट्रीवर महाराष्ट्राचाच पोलीस बंदोबस्ताला ठेवण्यात आले होते. या संदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर गुजरात प्रशासनाला जाग आली आणि तेथील पोल्ट्रीवर गुजरातचे पोलीस बंदोबस्ताला ठेवले. त्यानंतर तपासणीसाठी नमुनेही घेण्यात आले. इकडे महाराष्ट्रातील २२ पोल्ट्रीतील अहवाल पॉझीटिव्ह आल्याने तेथील सुमारे पावणेसहा लाख कोंबड्या शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्यात आल्या. उर्वरित पाच पोल्ट्रींचे अहवाल निगेटिव्ह आल्याने तब्बल १० दिवसांपासून अहोरात्र काम करणाऱ्या यंत्रणेने सुटकेचा निश्वास सोडला. पक्षांची किलिंग थांबविण्यात आली आणि विविध जिल्ह्यातून आलेल्या कर्मचाऱ्यांनाही विश्रांती देण्यात आली. मात्र महाराष्ट्रातील किलिंग थांबवताच गुजरातमधील ‘त्या’ पोल्ट्रींचे अहवाल पॉझिटीव्ह आले. विशेष म्हणजे तेथील पोल्ट्रीत एच ५, एन १ हा मनुष्यालाही धोका पोहचवू शकणाऱ्या विषाणू निष्पन्न झाला. त्यामुळे सुटकेचा नि:श्वास सोडून विश्रांतीचा मुडमध्ये आलेल्या महाराष्ट्र प्रशासनाची डोकेदुखी पुन्हा वाढली आहे. कारण गुजरातमधील तो पोल्ट्री फार्म हाकेच्या अंतरावरच असून, ज्या पाच पोल्ट्रीचे अहवाल निगेटिव्ह आल्याने तेथील किलिंग थांबविण्यात आले होते. त्या पोल्ट्री जवळच असल्याने तेथील सुमारे पाच लाख कोंबड्यांना पुन्हा गुजरातच्या या विषाणूचा धोका निर्माण झाला आहे. त्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासनाने पुन्हा खबरदारीच्या उपाययोजना सुरु केल्या आहेत.