तळोद्यातील कथित देहविक्रीप्रकरणी पाच जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:24 IST2021-05-03T04:24:56+5:302021-05-03T04:24:56+5:30

याप्रकरणी एकूण पाच आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यात तीन पुरुषांचा व दोन महिलांचा समावेश आहे. सर्वांना तीन दिवसांची ...

Five arrested for alleged prostitution in Talodya | तळोद्यातील कथित देहविक्रीप्रकरणी पाच जणांना अटक

तळोद्यातील कथित देहविक्रीप्रकरणी पाच जणांना अटक

याप्रकरणी एकूण पाच आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यात तीन पुरुषांचा व दोन महिलांचा समावेश आहे. सर्वांना तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

या गुन्ह्याच्या अनुषंगाने घटनास्थळी जाऊन पोलिसांनी पंचनामा केला. त्याठिकाणी दारूच्या बाटल्या आढळून आल्या. देहविक्रीबाबत कोणतेही पुरावे आढळून आले नाहीत. असे असले तरी पुढील तपासात यासंदर्भात देहविक्री व्यवसाय सुरू असल्याबाबत आढळून आले तर या गुन्हात वाढीव कलमे लावून कोर्टात चार्जचीट दाखल केली जाईल.

-देवीदास सोनवणे, पीएसआय,

नंदुरबार उपनगर पोलीस ठाणे

Web Title: Five arrested for alleged prostitution in Talodya