शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनानंतर उद्‌भवणाऱ्या बुरशीजन्य इन्फेक्शनची जिल्ह्यातील पहिली शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:31 IST

नंदुरबार : कोरोनानंतर रुग्णांमध्ये उद्‌भवणाऱ्या बुरशीजन्य इन्फेक्शनची जिल्ह्यातील पहिली शस्त्रक्रिया नंदुरबारात करण्यात आली. ६२ वर्षे वयाच्या वृद्धेवर ही यशस्वी ...

नंदुरबार : कोरोनानंतर रुग्णांमध्ये उद्‌भवणाऱ्या बुरशीजन्य इन्फेक्शनची जिल्ह्यातील पहिली शस्त्रक्रिया नंदुरबारात करण्यात आली. ६२ वर्षे वयाच्या वृद्धेवर ही यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली असून, त्यासाठी पाच डॅाक्टरांचे पथक तैणात करण्यात आले होते.

कोरोनातून बरे झालेल्या बऱ्याच रुग्णांना म्यूकर मायकोसीस या आजाराला सामोरे जावे लागत आहे. नंदुरबारात अशाच एका ६२ वर्षे वयाच्या वृद्धाला ही समस्या सतावत होती. नाकातील सायनसमध्ये व डोळ्यांच्या सभोवतालच्या भागात बुरशीजन्य इन्फेक्शन आढळून आले. डोळा व मेंदूच्यामधील सायनसमध्ये त्याचे प्रमाण अधिक होते. त्यासाठी तातडीने शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्याने पाच डॅाक्टरांची टिम तयार करण्यात आली. त्यात डॉ. विनय पटेल, डॉ. किरण जगदेव, डॉ. दिनेश पाटील, डॅा. यशपाल जावरे व डॅा.तेजस्वीनी कोळी यांचा त्यात समावेश होता. अत्याधुनिक एण्डोस्कोपी पद्धतीने ऑपरेशन करण्यात आले. अत्याधुनिक कॅाबलेटर व मायक्रोडीब्रायडरद्वारे डोळ्यांच्या बाजूस असणारे फंगल इन्फेक्शन काढण्यात आले. यामुळे वृद्धेच्या डोळ्यात इन्फेक्शनचा प्रादुर्भाव होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांचा डोळा वाचला. त्यामुळे डॅाक्टरांच्या टिमने तसेच रुग्णाच्या नातेवाइकांनीदेखील समाधान व्यक्त केेले.

फंगल इन्फेक्शनची लक्षणे आढळल्यास तातडीने सायनसचा सीटी स्कॅन व डोळ्यांचा एमआयआर करून घेणे आवश्यक आहे. त्यानुसार आजाराचे निदान करून उपचार किंवा शस्त्रक्रियेचा निर्णय घेता येऊ शकतो. परिणामी, डोळे निकामी होण्याचा धोका टळू शकतो. असे असले तरी कोरोनातून बरे झालेल्या सर्वांनाच हा आजार होऊ शकतो असे नाही, त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही.

-डॅा.राजेश कोळी, कान, नाक, घसा तज्ज्ञ, नंदुरबार.