शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
4
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
5
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
6
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
7
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
8
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
9
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
10
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
11
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
12
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
13
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
15
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
16
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
17
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
18
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
19
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
20
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
Daily Top 2Weekly Top 5

अर्जांचा पहिला दिवस निरंक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 12:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गणांसाठी अर्ज दाखल करण्यास बुधवार, १८ पासून ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गणांसाठी अर्ज दाखल करण्यास बुधवार, १८ पासून सुरुवात झाली. परंतु पहिला दिवस निरंक राहिला. दरम्यान, सहाही तहसील कार्यालयांमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय सज्ज होते. पोलीस बंदोबस्तही पुरेसा लावण्यात आला होता.आॅनलाईन अर्ज भरून त्याची प्रिंट आणि आवश्यक कागदपत्रे उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे. त्यानुसार आजचा पहिला दिवस आॅनलाईन अर्ज भरण्यासंदर्भातील माहिती घेण्यातच अनेक उमेदवारांचा गेला.शिवाय सर्वच पक्षांनी अद्याप उमेदवार यादी जाहीर केलेली नसल्याने इच्छूक देखील वेट अ‍ॅण्ड वॉचच्या भुमिकेत आहेत. तरीही अशा इच्छुकांनी आपली कागदपत्रे सज्ज ठेवली आहेत. नंदुरबार, शहादा, नवापूर, तळोदा, अक्कलकुवा धडगाव तहसील कार्यालयांमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय सुरू करण्यात आले आहेत. अशा ठिकाणी आचारसंहिता कक्ष देखील वेगळा ठेवण्यात आला आहे. सर्वच ठिकाणी आवश्यक तो पोलीस बंदोबस्त तैणात करण्यात आलेला आहे. शेवटच्या दोन दिवसात अर्ज भरण्यासाठी गर्दी होण्याची शक्यता आहे.