प्रकाशा येथे १० ऑगस्टला आढळला पहिला कोरोना रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:32 IST2021-03-23T04:32:17+5:302021-03-23T04:32:17+5:30

दिवाळी काळात केदारेश्वर, पुष्पदंतेश्वर, गौतमेश्वर आदी मंदिरांवर दीपोत्सव करण्यात येतो. मात्र यावर्षी या ठिकाणी साध्या पद्धतीनेच कार्यक्रम करण्यात आला. ...

The first corona patient was found on August 10 at Prakasha | प्रकाशा येथे १० ऑगस्टला आढळला पहिला कोरोना रुग्ण

प्रकाशा येथे १० ऑगस्टला आढळला पहिला कोरोना रुग्ण

दिवाळी काळात केदारेश्वर, पुष्पदंतेश्वर, गौतमेश्वर आदी मंदिरांवर दीपोत्सव करण्यात येतो. मात्र यावर्षी या ठिकाणी साध्या पद्धतीनेच कार्यक्रम करण्यात आला. ६ डिसेंबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन असतो. हा कार्यक्रम प्रकाशा येथे मोठ्या उत्साहात साजरा होतो. मात्र कोरोनाचा काळ असल्याने भीमसैनिकांनीही अतिशय साध्या पद्धतीने हा कार्यक्रम केला होता. ७ डिसेंबर रोजी कालभैरव जयंती प्रकाशा येथे दोन दिवसांपर्यंत पूजाविधी चालतो. होमहवन, भंडारा आदी कार्यक्रम होतात. मात्र कालभैरव जयंतीही शांततेत साजरी झाली. ११ मार्च रोजी महाशिवरात्री होती. महाशिवरात्रीच्या चार दिवस आधीच राम नाम जप, भजन-कीर्तन आदी उत्सव केदारेश्वर मंदिरावर सुरू होतात. मात्र यावर्षी कोरोनामुळे भाविकांनी मंदिरावर न येता रामनाम जप घरीच करण्याचे ट्रस्टींकडून सांगण्यात आले होते.

एकंदरीत, कोरोनामुळे भाविकांची आजही मंदिरात पाहिजे तशी गर्दी होत नाही. त्यामुळे मंदिरातील पुजारी, छोटे-मोठे दुकानदार यांच्यावरही उपासमारीची वेळ आलेली आहे. वर्षभर केदारेश्वर मंदिरावर भाविकांची वर्दळ असते. नर्मदा, तापी परिक्रमा करणारे भाविकही मोठ्या प्रमाणावर येतात. मात्र कोरोनामुळे येथील वर्दळ कमी झाली आहे. पूजाविधी, भंडारा या ठिकाणी बंद असल्याने छोटे व्यापारी, नारळ, बेलफूल विक्रेते, रसवंती व इतर व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. देवाचे गाव म्हणून ओळखले जाणारे प्रकाशा हे तीर्थक्षेत्र भाविकांविना सुने सुनेच आहे.

Web Title: The first corona patient was found on August 10 at Prakasha