नवापुरात सॉमिलला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:31 IST2021-03-31T04:31:20+5:302021-03-31T04:31:20+5:30

श्रीरंग अवधूत सॉमिलमध्ये वेगवेगळया प्रजातीचे मौल्यवान लाकूड व फर्निचर ठेवण्यात आले होते. या भीषण आगीत सुमारे २० लाख रुपयांचे ...

Fire at Somil in Navapur | नवापुरात सॉमिलला आग

नवापुरात सॉमिलला आग

श्रीरंग अवधूत सॉमिलमध्ये वेगवेगळया प्रजातीचे मौल्यवान लाकूड व फर्निचर ठेवण्यात आले होते. या भीषण आगीत सुमारे २० लाख रुपयांचे मौल्यवान सागवान लाकूड जाळून खाक झाले आहे. आगीची माहिती मिळताच, सॉमिलचे मालक अश्विन काथावाला, आनंद काथावाला, परिवारातील सदस्य, कामगार व आजूबाजूचे शेतकरी घटनास्थळी धावून आले. सॉमिलमधील बोअरवेलच्या साहाय्याने सुरुवातीला आग विझविण्याचा प्रयत्न केला, परंतु हवेचा वेग जास्त असल्याने आग आटोक्याबाहेर गेल्याने तत्काळ नवापूर नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. आगीचे लोळ वर जात असल्याने, साधारणतः दोन अग्निशमन बंबांच्या साहाय्याने अडीच तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले, परंतु या आगीने काथावाला परिवाराचे २० लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

मोठे सागवान लाकूड व लाकडाच्या फळ्या एकावर एक रचून ठेवल्या असल्याने त्यावर पाणी मारून आग विझविली, तरी काही वेळाने खालच्या फळ्यांमध्ये आग धुमसत असल्याने ती पुन्हा पेट घेत आहे. त्यामुळे वखारीतील लाकडे बाजूला करून आग विझविण्याचे काम सुरू होते. काही वर्षांपूर्वीही या परिसरात भीषण आग लागल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. आता लागलेल्या आगीचा पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

Web Title: Fire at Somil in Navapur