शॉर्टसर्कीटने लागलेल्या आगीत घर जळून खाक

By Admin | Updated: May 20, 2017 18:22 IST2017-05-20T18:22:06+5:302017-05-20T18:22:06+5:30

टी़व्ही़ , कपाट, संसारोपयोगी वस्तूंसह सोन्याचे दागिने आणि 70 रुपयांच्या रोख रकमेचा समावेश आह़े

A fire broke out in a short-circcut fire and burnt the house | शॉर्टसर्कीटने लागलेल्या आगीत घर जळून खाक

शॉर्टसर्कीटने लागलेल्या आगीत घर जळून खाक

ऑनलाइन लोकमत

नंदुरबार, दि. 20 - तालुक्यातील रजाळे येथील शेतकरी रोहिदास रधुनाथ पाटील यांच्या घराला शॉर्ट सर्कीटमुळे आग लागल्याने यात संपूर्ण घर जळून खाक झाले.  यात, टी़व्ही़ , कपाट,  संसारोपयोगी वस्तूंसह सोन्याचे दागिने आणि 70 रुपयांच्या रोख रकमेचा समावेश आह़े
 रोहिदास पाटील यांच्या घराला शनिवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास अचानक भीषण आग लागल्यामुळे परिसरातील रहिवाशांचीही एकच धावपळ उडाली़ आगीचे रौद्र रुप पाहून सर्वजण भयभीत झाले.  परिसरात हवेचा वेग जोरात असल्याने आग अधिकच पसरत असल्याचे प्रत्यक्षदर्शीकडून सांगण्यात आल़े
आग विझवण्यसाठी परिसरातील ग्रामस्थांकडून मोठय़ा प्रमाणात प्रयत्न करून आग आटोक्यात आणली, मात्र तोर्पयच ब:याच प्रमाणात नुकसान झाले होत़े पाटील यांचे घर लागडाचे असल्याने आगीने मोठय़ा प्रमाणात पसरली होती़
 

Web Title: A fire broke out in a short-circcut fire and burnt the house