शहरं
Join us  
Trending Stories
1
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
2
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
3
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
4
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
5
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
6
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
7
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
8
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
9
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
10
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
11
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
12
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
13
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
14
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
15
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
16
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
17
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
18
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
19
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
Daily Top 2Weekly Top 5

सिव्हीलच्या हस्तांतरणाची प्रक्रिया अंतिम टप्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 12:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : वैद्यकीय महाविद्यालयाबाबत केंद्रीय समितीने काढलेल्या त्रुटी पुर्ण करून जिल्हा रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालयाकडे हस्तांतरण करण्याची ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : वैद्यकीय महाविद्यालयाबाबत केंद्रीय समितीने काढलेल्या त्रुटी पुर्ण करून जिल्हा रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालयाकडे हस्तांतरण करण्याची प्रक्रियेला वेग आला आहे. त्रुटीच्या पुर्तता पुर्ण झाल्या किंवा कशा याची पहाणी करण्यासाठी केंद्रीय समिती लवकरच नियोजित वैद्यकीय महाविद्यालयाला भेट देण्याची शक्यता आहे.नंदुरबारात वैद्यकीय महाविद्यालय मंजुर झाले आहे. परंतु प्रत्यक्षात महाविद्यालय सुरू होण्यासंदर्भात असलेली तयारी अगदीच धिम्या गतीने सुरू होती. त्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात येत होती. गेल्या सहा महिन्यांपासून मात्र महाविद्यालयाच्या आवश्यक बाबींच्या पूर्ततेसाठीच्या तयारीला वेग आला आहे.केंद्रीय समितीची भेटदोन महिन्यांपूर्वी केंद्रीय समितीने नियोजित महाविद्यालयाला भेट दिली होती. त्यावेळी समितीने अनेक त्रुट्या काढल्या होत्या. त्या त्रुटी दूर करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता. वेळेत त्रूटी दूर झाल्यास समिती पुन्हा भेट देवून आपला अहवाल देणार आहे. आता अहवाल आॅल क्लेअर असल्यास पुढील शैक्षणिक वर्षापासून महाविद्यलायात पहिल्या वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे त्रूटी दूर करण्याचा प्रयत्न गेल्या महिनाभरापासून युद्धपातळीवर सुरू आहे. यासाठी स्थानिक स्तवंत्र समित्याही नियुक्त करण्यात आल्या आहेत.हस्तांतर प्रक्रिया अंतीम टप्प्यातजिल्हा रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालयाकडे हस्तांतर करण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. संपुर्ण रुग्णालयात ज्या ज्या ठिकाणी जिल्हा रुग्णालय आणि त्याअंतर्गत येणारे विभाग व त्यांचे फलक होते ते सर्व बदलण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. शुक्रवारी तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्याच्या समितीने या सर्व प्रक्रियेची पहाणी केली.आवश्यक बेडची संख्या पुर्णजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय महाविद्यालयासाठी लागणाºया आवश्यक बेडची संख्या पुर्ण झाली आहे. साधारणत: ५०० बेडची गरज असते, ती पुर्ण झाली आहे. त्यामुळे रुग्णालय हस्तांतरण करण्यास यापूर्वीच मान्यता देण्यात आली आहे.जिल्हा रुग्णालयातील आवश्यक ते सर्व कर्मचारी देखील आता वैद्यकीय रुग्णालयाकडे वर्ग होणार आहेत. यामुळे आताच्या परिस्थितीत ७० टक्के अधिकारी व कर्मचाऱ्यांची पूर्तता पुर्ण झाली आहे. उर्वरित ३० टक्के कर्मचारी हे सरळ सेवा भरतीनेच भरावे लागणार आहेत. त्यासाठी लवकरच शासनाची मंजुरी घेतली जाणार आहे. कंत्राटी कर्मचाºयांचा प्रश्न मात्र कायम राहणार आहे. या कर्मचाºयांनाही सामावून घेतले जावे अशी मागणी करण्यात येत आहे.