शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प यांची अचानक उदारता कशासाठी?
2
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
3
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
4
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
5
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
6
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
7
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
8
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
9
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
10
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
11
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
12
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
13
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
14
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
15
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
16
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
17
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
18
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
19
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
20
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
Daily Top 2Weekly Top 5

बोरद येथे वीज कंपनी कार्यालयाबाहेर शेतकऱ्यांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:20 IST

यावेळी उपभियंत्यासही शेतकऱ्यांनी कार्यालयात डांबून ठेवले होते. शेवटी कृषीपंपाचे चालू बिल म्हणजे पाच हजार रुपये भरण्यावर तोडगा निघाल्याने शेतकऱ्यांनी ...

यावेळी उपभियंत्यासही शेतकऱ्यांनी कार्यालयात डांबून ठेवले होते. शेवटी कृषीपंपाचे चालू बिल म्हणजे पाच हजार रुपये भरण्यावर तोडगा निघाल्याने शेतकऱ्यांनी ठिय्या मागे घेतला. दरम्यान, चालू वीजबिल भरण्यासाठी शेतकऱ्यांनी कार्यालयात गर्दी केली होती. तळोदा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कृषीपंपांचे साधारणत साठ कोटी रुपयांचे वीज वितरण कंपनीचे वीजबिल बाकी आहे. ५० टक्के बिल न भरणाऱ्या शेतकऱ्यांची कृषीपंपाची वीजजोडणी कट करण्याची कार्यवाही येथील वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून गेल्या पाच दिवसांपासून सरू केली आहे. अजून शेतकऱ्यांची पिके शेतातच उभी आहेत. शिवाय कुठलाही हंगाम नसताना कनेक्शन कट करण्याची मोहीम वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सुरू केल्यामुळे बोरद परिसरातील मोहिदा, खरवड, मोड, तऱ्हावद, खेडले, तळवे, मोरवड, लाखापूर या गावांमधील सुमारे १५० शेतकऱ्यांनी गुरुवारी वीज कंपनीचे बोरद येथील कार्यालय गाठून सकाळी नऊ वाजेपासून दुपारी बारा वाजेपर्यंत म्हणजे तब्बल तीन तास कार्यालयाबाहेर ठिय्या मांडला होता.

यावेळी कार्यालयाचे अभियंता गुरव यांनाही शेतकऱ्यांनी कार्यालयात डांबून ठेवले होते. त्याचवेळी तळोदा कार्यालयाचे उपविभागीय उपअभियंता प्रदीप चाहांदे घटनास्थळी दाखल झाले. शेतकरी तीन हजार रुपये बिल भरण्यावर ठाम होते तर कंपनीचे अधिकारी पाच हजार रुपये भरावे किंवा चालू बिल भरावे यावर ठाम होते. बुधवारी झालेल्या बैठकीत ठरल्याप्रमाणे वीजबिल भरावे, अशी अट अधिकाऱ्यांची होती. त्यामुळे शेतकरी व अधिकाऱ्यांमध्ये चांगलीच गरमागरमी सुरू होती. येथील वातावरण अधिकच तंग बनले होते. शेवटी शहादा विभागाचे अधीक्षक अभियंता किसन पावरा यांच्याशी अधिकारी व शेतकऱ्यांनी संवाद साधला. त्यानंतर चालू वीजबिल अथवा पाच हजार रुपये भरण्याचे निश्चित झाल्यानंतर ठिय्या मागे घेतला.