शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
6
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
7
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
8
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
9
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
10
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
11
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
12
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
13
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
14
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
15
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
16
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
17
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
18
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
19
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
20
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी म्हणतात बिल द्या कंपनी सांगते बिल भरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:29 IST

नंदुरबार : जिल्ह्यातील ५५ हजार कृषीपंपधारक शेतकऱ्यांकडे वीज कंपनीचे २५८ कोटी रुपये थकीत आहेत. या थकबाकीची वसुली पुन्हा सुरु ...

नंदुरबार : जिल्ह्यातील ५५ हजार कृषीपंपधारक शेतकऱ्यांकडे वीज कंपनीचे २५८ कोटी रुपये थकीत आहेत. या थकबाकीची वसुली पुन्हा सुरु झाली असून बऱ्याच ठिकाणी कंपनीने योग्य ते बिल देत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. यानंतरही कंपनी वसुलीसाठी तगादा लावत आहे.

वीज कंपनीच्या नंदुरबार आणि शहादा अशा दोन विभागात शेती पंपांसाठी स्वतंत्र वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. गेल्या १० वर्षात या कृषीपंपांची थकबाकी ही कोट्यवधी रुपयांच्या घरात गेली आहे. यात कृषीपंपधारक शेतकरी हे योग्य त्या प्रकारचे बिल मिळत नसल्याने भरणा करु शकत नसल्याचे समोर आले आहे.

दरम्यान याबाबत वीज कंपनीचे अधिक्षक अभियंता यांच्यासोबत संपर्क केला असता, तो होऊ शकला नाही. परंतु जिल्ह्यात कृषीपंपधारकांकडून योग्य पद्धतीने वीज बिल वसुली होत असल्याची माहिती देण्यात आली.

शेतकऱ्यांना योग्य त्या पद्धतीने कंपनीने बिले दिली पाहिजेत. वेळोवेळी बिले नसल्याने शेतकरी व वीज कंपनी यांच्या खटके उडत आहेत. शेतकरी रक्कम भरण्यास तयार असतात परंतु कंपनीकडून योग्य त्या पद्धतीने कारवाई करण्यात येत नाही. शेतकऱ्यांना किती व कसा वीज वापर झाला याची माहिती दिली पाहिजे.

-प्रविणसिंग भटेसिंग राजपूत, शेतकरी.

सातत्याने बिलांची वसुली करण्याबाबत कार्यवाही करण्यात येते. परंतू वीज बिले मात्र दिली जात नाहीत. यंदा मार्च महिन्याच्या पार्श्वभूमीवर वसुली सुरु होणार असल्याची माहिती आहे. यातून बिले देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. परंतु ही बिले नेमकी कोणत्या कालावधी व किती वापराची देणार याबाबत कंपनी बोलत नाही. कंपनीने हे स्पष्ट करावे.

-नंदू काशिनाथ पाटील,शेतकरी,

वीज कंपनीला सर्वच शेतकरी सहकार्य करतात. परंतु कंपनीकडून शेतकऱ्यांना योग्य ती माहिती दिलीच जात नाहीत. कोणताही शेतकरी विजेची थकबाकी ठेवत नाही. परंतू योग्य ते बिल योग्य त्या वेळी मिळतच नाही आणि मिळाल्यास त्यात युनिट वापरात तफावत असते. शेतकऱ्यांना मासिक किंवा त्रैमासिक बिले दिली गेली पाहिजेत.

-राजेंद्रगीर विक्रमगीर गोसावी,शेतकरी.