अधिकाऱ्यांसोबत चर्चेनंतर शेतकऱ्यांचे आंदोलन स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 12:41 PM2020-09-23T12:41:10+5:302020-09-23T12:41:18+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : शेतकरी व इंडियन आॅईल कंपनी चे अधिकारी यांच्यात चर्चा होत नाही व शेतकºयांच्या मागण्या ...

Farmers' agitation suspended after discussions with officials | अधिकाऱ्यांसोबत चर्चेनंतर शेतकऱ्यांचे आंदोलन स्थगित

अधिकाऱ्यांसोबत चर्चेनंतर शेतकऱ्यांचे आंदोलन स्थगित

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : शेतकरी व इंडियन आॅईल कंपनी चे अधिकारी यांच्यात चर्चा होत नाही व शेतकºयांच्या मागण्या मान्य होत नाही तोवर पाईपलाईनचे काम बंद करण्याचे आश्वासन मिळाल्याने बुधवारपासून होणारे शेतकºयांचे आंदोलन स्थगीत करण्यात आले.
नवापूर तालुक्यातून जाणाºया केंद्रीय पेट्रोलियम पाईप लाईनचे काम वादात अडकले आहे़ जमिनीचा मिळणारा मोबदल्याच्या मुद्द्यावरून शेतकºयांमध्ये असंतोष पसरल्याने काम बंद पाडले जात आहे. शेतकºयांसोबत चर्चा करुन सकारात्मक तोडगा निघेपर्यंत काम बंद करण्यात यावे यासाठी अखिल महाराष्ट्र आदिवासी विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष आऱसीग़ावीत यांच्यासह शेतकºयांनी तहसिलदार सुनिता जºहाड यांना निवेदन दिले होते. निवेदनात २३ सप्टेंबरपासून उपोषणाचा इशारा देण्यात आला होता़ या अनुषंगाने मंगळवारी तहसीलदार जºहाड यांच्या दालनात संघटनेचे आऱसीग़ावीत, भाजपचे अनिल वसावे यांच्यासह शेतकºयांची बैठक घेण्यात आली. बैठकीत तहसिलदार जºहाड व पोलिस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांनी शेतकºयांसोबत चर्चा केली़ शेतकºयांनी कंपनीने काम बंद करावे तरच उपोषण मागे घेतले जाईल अशी भूमिका घेतली होती़ चर्चेअंती कंपनीचे अधिकारी आणि शेतकरी यांच्यात चर्चा होत नाही तोवर पाईप लाईनचे काम बंद करण्याचे आश्वासन अधिकाºयांनी दिल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले़ चर्चेपूर्वी काम सुरू झाल्यास शेतकरी तिव्र आंदोलन करतील असा इशारा यावेळी देण्यात आला़ याप्रसंगी दिलीप गावीत, कांतीलाल गावीत, शमुवेल गावीत, शलमोन गावीत, नाथु गावीत, विनायक गावीत, कोन्या मावची, विजय गावीत, गुलाब गावीत, अनिल गावीत आदी उपस्थित होते़

Web Title: Farmers' agitation suspended after discussions with officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.