मांजरे येथे शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:20 IST2021-07-22T04:20:11+5:302021-07-22T04:20:11+5:30

प्रवीण आसाराम पाटील (४४) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. प्रवीण पाटील हे बुधवारी पहाटेच्या सुमारास शेतात पाणी भरण्यासाठी गेले ...

Farmer commits suicide at Manjre | मांजरे येथे शेतकऱ्याची आत्महत्या

मांजरे येथे शेतकऱ्याची आत्महत्या

प्रवीण आसाराम पाटील (४४) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. प्रवीण पाटील हे बुधवारी पहाटेच्या सुमारास शेतात पाणी भरण्यासाठी गेले होते. सकाळी परत न आल्याने त्यांच्या पत्नीने मुलगा आणि पुतण्या या दोघांना प्रवीण पाटील यांचा तपास करण्यासाठी पाठवले असता, शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले. प्रवीण पाटील हे अल्पभूधारक शेतकरी होते. डोक्यावर बँकेचे १ लाख २० हजार रुपये कर्ज असल्याने ते सतत चिंतेत राहत होते. मुलगीही लग्नाची असल्याने तिच्या विवाहाची चिंताही त्यांना सतावत होती. यात पाऊस न आल्याने चिंतेत वाढ होऊन त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात आले. शेतकरी पाटील यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.

Web Title: Farmer commits suicide at Manjre