शहरं
Join us  
Trending Stories
1
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
2
Top Marathi News LIVE Updates: मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला मोठं 'बळ', बहुमत चाचणीआधी तामिळनाडूत मोठी घडामोड
3
मोठी बातमी: पेपर फुटला, नीट २०२६ ची परीक्षा रद्द, सीबीआय चौकशीचे आदेश
4
सीजफायरचा फक्त देखावा! इराणने रशिया-चीनकडून जमवला शस्त्रास्त्रांचा डोंगर; 'या' देशांना दिला इशारा
5
ज्याने कपाटात 'सीक्रेट' कप्पा बनवला, त्यानेच हात साफ केला! ३० लाखांची चोरी करून कारागिर फरार
6
Gold Import: सोन्याच्या आयातीमुळे देशाच्या तिजोरीवर पडला मोठा भार, सोन्याने भारताची चिंता का वाढवलीये?
7
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
8
अनधिकृत बाइक टॅक्सी ॲप्सवर कारवाईचे आदेश; प्रताप सरनाईक यांचे सायबर क्राइम विभागाला पत्र
9
देश प्रथम! PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; मंत्री शंभूराज देसाईंचा लंडन-पॅरिस दौरा रद्द
10
भाजप नेत्यांनी ५० गाड्यांच्या ताफ्यासह भोपाळला काढली रॅली, PM मोदींचं आवाहन नेते दुसऱ्याच दिवशी विसरले!
11
'या' Infra कंपन्यांची लागली लॉटरी! ११ हजार कोटींचा प्रोजेक्ट मिळताच स्टॉक सुस्साट, हाती आला रेल्वे-हायवेचा प्रोजेक्ट
12
Mumbai Crime: ब्युटीशियन मनाली यांची अंबोलीत हत्या; अवघ्या दोन तासांत मित्रास घाटकोपरमध्ये केले अटक
13
संध्याकाळपर्यंत कुणी ओळखत नव्हता, एका रात्रीत बनला हीरो, कोण आहे माधव तिवारी?  
14
Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू
15
पुण्याच्या स्वप्नालीने वडिलांना व्हिडीओ कॉल केला अन्...; मुंबईतील वरळीमध्ये घडली हादरवून टाकणारी घटना
16
'I Love You'ला टाकलं मागे! गुगल ट्रान्सलेटवर २० वर्षांत 'या' शब्दाचा झाला सर्वाधिक वापर
17
शेअर असावा तर असा! 'ही' कंपनी गुंतवणूकदारांना प्रत्येक स्टॉकवर देणार ₹६५६ चा लाभांश, रेकॉर्ड डेट कधी?
18
बुधवारी अपरा एकादशी २०२६: ‘असे’ करा व्रत पूजन, शुभ मुहूर्त काय? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Numerology: कोणत्या दिवशी नवीन काम सुरू करावं? जन्मतारखेनुसार जाणून घ्या तुमचा 'शुभ वार'
20
मध्य रेल्वेच्या ८४८ मोटरमनवर कामाच्या ओझ्यापेक्षा नियमांचाच अधिक ताण; कर्मचारी उच्च रक्तदाब, मूत्रपिंडाच्या व्याधींनी त्रस्त
Daily Top 2Weekly Top 5

प्रथा, परंपरांना फाटा देत बाप्पांना निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 12:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाचे विघ्न पळवा आणि पुढच्या वर्षी लवकर या अशी आर्जव करीत गणेश भक्तांनी मंगळवारी ...


लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोनाचे विघ्न पळवा आणि पुढच्या वर्षी लवकर या अशी आर्जव करीत गणेश भक्तांनी मंगळवारी बाप्पांना निरोप दिला. कुठलेही वाद्य नाही, मिरवणुका नाही की गुलालाची उधळण नाही अशा साध्या पद्धतीने यंदा बाप्पांना निरोप द्यावा लागला. मानाच्या दादा गणपतीचे सकाळी १०.५० तर बाबा गणपतीचे दुपारी सव्वाबारा वाजता सोनी विहिरीत विसर्जन करण्यात आले. दरम्यान, हरिहर भेटीची परंपरा यंदा खंडित झाली.
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर यंदा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. मंडळांची संख्या देखील यंदा कमी झाली होती. मिरवणुका काढण्यात आल्या नाहीत. शिवाय इतर सर्व पारंपारिक प्रथा, परंपरांना फाटा देण्यात आला. प्रशासनाच्या आवाहनाला सर्वच गणेश मंडळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
अनंत चतुदर्शीला बाप्पांना निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मिरवणुका निघतात. विविध पारंपारिक पद्धतीने कार्यक्रम होत असतात. यंदा त्यांना फाटा देण्यात आला. मानाच्या गणपतींनी आपल्या पारंपारिक रथाऐवजी ट्रॅक्टर ट्रॉलीवर मूर्ती ठेऊन विसर्जनासाठी नेली. मिरवणुकाच नसल्यामुळे दरवर्षी आकर्षणाचे केंद्रबिंदू राहणाऱ्या हरिहर भेटीलाही फाटा देण्यात आला.
याशिवाय इतर सार्वजनिक गणेश मंडळांनी परस्पर मूर्ती विसर्जनासाठी नेल्या. नंदुरबारात तीन ठिकाणी कृत्रीम हौद करण्यात आले होते. त्या ठिकाणी मूर्ती विसर्जनासाठी सायंकाळी उशीरापर्यंत गर्दी होती. पालिकेतर्फे दोन ठिकाणी वाहनांची व्यवस्था कण्यात आली होती. तेथे मूर्ती स्विकारल्या जात होत्या. देखील याशिवाय शहराच्या परिसरात असणारे लहान, मोठे तलाव, बंधारे यांच्यात देखील मूर्ती विसर्जनासाठी गर्दी झाली होती.
शहरातून प्रकाशा किंवा इतर ठिकाणी मूर्ती विसर्जनासाठी जाऊ नये याकरीता चारही बाजुंच्या चौफुलींवर पोलीस तैणात करण्यात आले होते. याशिवाय शहरात देखील ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैणात करण्यात आला होता.