शहाद्यातही स्वॅबचे नमुने घेण्याची आजपासून सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 12:20 IST2020-04-30T12:20:16+5:302020-04-30T12:20:29+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरातील कोरोना विषाणू संशयित नागरिकांचे स्वॅब तपासणीसाठीचे नमुने शहाद्यात घेण्याची सुविधा शासनाच्या वतीने करण्यात ...

The facility to take swab samples in Shahada from today | शहाद्यातही स्वॅबचे नमुने घेण्याची आजपासून सोय

शहाद्यातही स्वॅबचे नमुने घेण्याची आजपासून सोय

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : शहरातील कोरोना विषाणू संशयित नागरिकांचे स्वॅब तपासणीसाठीचे नमुने शहाद्यात घेण्याची सुविधा शासनाच्या वतीने करण्यात आली आहे. गुुरुवारपासून ते सुरू होणार आहे. बुधवारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रघुनाथ भोये यांनी शहाद्याला भेट देऊन पाहणी केली.
आतापर्यंत शहरातील ६३ नागरिकांचा अहवाल प्राप्त झाला असून पैकी ५४ अहवाल निगेटिव्ह आले असून नऊ अहवाल पॉझिटिव्ह आले आहे त्यातील एक मयत झाला असल्याची माहिती प्रांत अधिकारी डॉक्टर चेतन गिरासे यांनी दिली.
शहरात कोरोना चे नऊ रुग्ण आढळून आले आहेत. मंगळवारी एका दिवशी सर्वाधिक पाच रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यात ही सर्वाधिक संख्या असल्याने प्रशासनातर्फे कोरोनाची साखळी वाढू नये यासाठी विशेष खबरदारी बाळगली जात आहे रुग्ण संख्या वाढल्याने आज जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर रघुनाथ भोये यांनी शहाद्याला भेट देऊन आरोग्य व्यवस्थेची पाहणी केली क्वारंटाईन कक्षाची ही पाहणी केली वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बैठकी घेतल्या.
यापूर्वी संशयित रुग्णांच्या स्वॅब तपासणीसाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात रुग्णांना पाठवावे लागत होते. गुरुवारपासून शहाद्यात संशयित रुग्णांचे स्वॅब नमुने घेण्याची सुविधा शासनाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे प्रशासनाचा वेळ वाचणार आहे व अहवाल लवकर उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.

Web Title: The facility to take swab samples in Shahada from today