बेज्याआंबा व भट्टीपाड्याला असुविधेचा वेढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 12:20 PM2020-02-19T12:20:29+5:302020-02-19T12:20:47+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दुर्गम भागातील गौऱ्याच्या बेज्याआंबा व भट्टीपाडा या दोन्ही पाड्यांच्या चौफेर गाव पाड्यांपर्यंत रस्ते पोहोचले ...

Extreme inconvenience and inconvenience | बेज्याआंबा व भट्टीपाड्याला असुविधेचा वेढा

बेज्याआंबा व भट्टीपाड्याला असुविधेचा वेढा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : दुर्गम भागातील गौऱ्याच्या बेज्याआंबा व भट्टीपाडा या दोन्ही पाड्यांच्या चौफेर गाव पाड्यांपर्यंत रस्ते पोहोचले आहेत, परंतु हेच दोनपाडे रस्ते विकासापासून वंचित राहिले आहे. त्यामुळे तेथे अन्य विकासकामेही होऊ शकली नाही. पायाभूत सुविधाही मिळत नसल्याने तेथील नागरिकांची गैरसोय होत आहे.
धडगाव तालुक्यातील गौºया हे तळोदा ते धडगाव या मुख्य रस्त्यावरील गाव असून १३ पाड्यांमध्ये विभागले आहे. तसे हे गाव विविध योजना व सुविधांंबाबत नेहमीच चर्चेत राहिले असून बोदलापाड्याच्या माध्यमातून प्रकाशात आले. बोदलापाड्याच्या काही समस्या कायम असतांनाच पुन्हा भट्टीपाडा व बेज्याआंबापाडा या दोन पाड्यांबाबत चर्चा सुरू झाली आहे.
भट्टीपाड्यापर्यंत जाण्यासाठी सन २००० मध्ये रस्ता मंजूर करीत कामही करण्यात आले. परंतु वरवरच्या खडीकरणचे काम वगळता या रस्त्यावर अन्य कुठलेही काम करण्यात आले नाही. त्यामुळे हा रस्ता कुठल्याही वाहतुकीसाठी अनुकुल ठरत नाही. रस्त्याचे काम होऊन २० वर्षांचा कालावधी उलटला, त्यामुळे सद्यस्थितीत हा रस्ता पायवाटेपेक्षा अधिक खराब झाला आहे. कुटबारापासून झालेल्या या रस्त्याची दोन वर्षापूर्वी दुरुस्ती करण्यात आली. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी कुठल्याही योजनेतून निधी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न होत असल्याचे म्हटले जात आहे.

या दोन्ही पाड्याच्या चौफेरील गौºया, चुलवड, बिजरी, काकरपाटी व सिसा या गावांपर्यंत रस्ते पोहोचले आहे. या पाजही गावांना लागून असलेल्या या दोन पाड्यांपर्यंतच रस्ता पोहोचला नसल्याने शोकांतिका व्यक्त होत आहे.
नागरिकांना बिजरी, बियारावड, काकरपाटी व चुलवड येथून वाहन उपलब्ध होते. परंतु त्यांना प्रत्येक ठिकाणी पोहोचण्यासाठी चार किलोमिटर पायपीट करावी लागते.
पाण्याची सुविधा असली तरी लोकसंख्येच्या तुलनेत पुरेशी ठरत नाही. त्यामुळे नागरिकांना उदय नदीवरुन पिण्यासाठी पाणी घ्यावे लागते. हे पाणी पितांना शुद्धतेच्या दृष्टीने शाश्वत ठरत नाही.
भट्टीपाड्याची लेकसंख्या ५०० तर बेज्याआंबापाड्यात ९ कुटुंब वास्तव्यास आहे. त्यांना विकास प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न होणे अपेक्षित आहे.

Web Title: Extreme inconvenience and inconvenience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.