४० टक्के निधी खर्च करण्याची कसरत, बीडीएस प्रणालीमुळे सूसुत्रता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:28 IST2021-03-28T04:28:48+5:302021-03-28T04:28:48+5:30

नंदुरबार : जिल्हा वार्षिक नियतव्ययाच्या ४० टक्के निधी खर्च करण्यासाठी सद्या नियोजन विभागात धावपळ सुरू आहे. दरम्यान, बीडीएस प्रणालीमुळे ...

Exercise to spend 40% of funds, coherence due to BDS system | ४० टक्के निधी खर्च करण्याची कसरत, बीडीएस प्रणालीमुळे सूसुत्रता

४० टक्के निधी खर्च करण्याची कसरत, बीडीएस प्रणालीमुळे सूसुत्रता

नंदुरबार : जिल्हा वार्षिक नियतव्ययाच्या ४० टक्के निधी खर्च करण्यासाठी सद्या नियोजन विभागात धावपळ सुरू आहे. दरम्यान, बीडीएस प्रणालीमुळे निधी वितरणाची प्रक्रिया सुटीसुटीत झाली आहे.

नंदुरबार जिल्ह्याचा वार्षिक नियतव्ययाचा एकुण ५५ ते ६० टक्के खर्च झाला आहे. गेल्या वर्षभरात कोरोना आणि लॅाकडाऊनमुळे निधी खर्च करण्यात काहीशा अडचणी आल्या होत्या. नंतरच्या काळात मात्र त्यात सुसूत्रता आली. आमदार, व खासदार निधी देखील पूर्ण खर्च होण्यात आला आहे. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या नियोजन समितीच्या बैठकीत निधी खर्चाचा आढावा घेण्यात आला होता. त्यावेळी पालकमंत्र्यांनी सर्व निधी वेळेवर खर्च करण्याच्या सुचना दिल्या होत्या. मार्च अखेर निधी परत जाऊ नये यासाठी नियोजन विभागात सद्या काम सुरू आहे. सुट्टीच्या दिवशी देखील काही कर्मचारी उपस्थित राहत असल्याचे चित्र आहे.

Web Title: Exercise to spend 40% of funds, coherence due to BDS system