प्रकाशा बॅरेज कार्यालय परिसरात मृतावस्थेत कावळे आढळल्याने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:32 IST2021-01-23T04:32:42+5:302021-01-23T04:32:42+5:30

सविस्तर वृत्त असे की, प्रकाशा येथील बसथांब्याच्या मागील बाजूस बॅरेज कॉलनी आहे. याठिकाणी प्रकाशा बॅरेजसह विविध विभागाची पाच ...

Excitement over the discovery of dead crows in the Prakasha Barrage office area | प्रकाशा बॅरेज कार्यालय परिसरात मृतावस्थेत कावळे आढळल्याने खळबळ

प्रकाशा बॅरेज कार्यालय परिसरात मृतावस्थेत कावळे आढळल्याने खळबळ

सविस्तर वृत्त असे की, प्रकाशा येथील बसथांब्याच्या मागील बाजूस बॅरेज कॉलनी आहे. याठिकाणी प्रकाशा बॅरेजसह विविध विभागाची पाच कार्यालये आहेत. येथील चिंचेच्या झाडावरून पाच ते सहा कावळे मरण पावल्यानंतर खाली कोसळलेले दिसले. काही मृतावस्थेतील कावळे कुत्र्यांनी पळवून नेल्याचे स्थानिकांनी सांगितले. त्यामुळे बर्ड फ्लूने तर या कावळ्यांचा मृत्यू झाला नाही ना? अशी शंका व्यक्त करण्यात येत असून, त्याबाबत शहानिशा होणे गरजेचे आहे.

सध्या राज्यातील काही जिल्ह्यात बर्ड फ्लूने थैमान घातले आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रकाशा बॅरेज कॉलनीत शुक्रवारी अचानक चार ते पाच कावळे मृतावस्थेत आढळल्याने भीती निर्माण झाली आहे. याठिकाणी भेट दिली असता दोन कावळे मृतावस्थेत तर काही कावळ्यांचे पंख याच परिसरात दिसून आले. या परिसरात पंखही आढळून आल्याने मृत झालेले कावळे कुत्र्यांनी पळवून नेल्याचे दिसते. सायंकाळी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातील कर्मचारी गणेश धनगर यांनी मेलेले कावळे एका पिशवीत टाकून तपासणीसाठी दवाखान्यात नेले.

प्रकाशा येथील बॅरेज कार्यालयात संपर्क केला असता, शाखा अभियंता मयूर परदेशी यांनी सांगितले की, पक्षी मृतावस्थेत आढळले आहेत, त्याविषयीचे पत्र सायंकाळी पशुसंवर्धन विभाग प्रकाशा यांना दिले आहे.

धुळे पाटबंधारे विभाग यांनी एका पत्रान्वये प्रकाशा बॅरेजला कळवले आहे की, धरण परिसरात मृत अवस्थेत जर पक्षी आढळले तर त्यासंदर्भात त्वरित पशुसंवर्धन विभाग व विभागीय कार्यालयांना कळविण्यात यावे, असे पत्र धुळे पाटबंधारे विभागाने प्रकाशा उपविभागाचे उपविभागीय अधिकारी यांना १२ जानेवारी रोजी दिले आहे.

Web Title: Excitement over the discovery of dead crows in the Prakasha Barrage office area