शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

जुलै संपण्यास आला तरी पीककर्ज वाटप केवळ ४३ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:30 IST

नंदुरबार : राष्ट्रीयीकृत बँकांचे पीककर्ज वाटप यंदाही संथगतीने सुरू असल्याने जुलैअखेर येऊनही जिल्ह्यात केवळ ४३ टक्के पीक कर्जाचे वाटप ...

नंदुरबार : राष्ट्रीयीकृत बँकांचे पीककर्ज वाटप यंदाही संथगतीने सुरू असल्याने जुलैअखेर येऊनही जिल्ह्यात केवळ ४३ टक्के पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. एकूण ५०० कोटींच्या कर्जवाटपाचे उद्दिष्ट असताना राष्ट्रीयीकृत बँका निम्म्यापर्यंतही पोहोचलेल्या नाहीत. बँका कर्ज देण्यास टाळाटाळ करीत असल्याने शेतकरी उधार-उसनवारीने कर्ज घेत पेरण्या करीत आहेत.

जिल्ह्यात यंदा राष्ट्रीयीकृत, खासगी, ग्रामीण आणि सहकारी बँक मिळून एकूण ५६३ कोटी रुपयांपेक्षा अधिक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. साधारण एक लाखापेक्षा अधिक शेतकरी खातेदार असताना मात्र जिल्ह्यात दरवर्षी २० हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप होत नाही. यातून शेतकरी खासगी ठिकाणाहून कर्ज घेत पिकांची पेरणी करतात. जिल्ह्यातील २५ हजार २२ शेतकऱ्यांना गेल्या वर्षी महात्मा जोतिबा फुले कृषी कर्जमुक्ती अभियानांतर्गत लाभ मिळाला होता. यातून दीड लाख रुपये वजा झाल्याने या शेतकऱ्यांची खाती रिकामी झाली हाेती. लाभधारकांसोबतच नियमित खातेदारांना यंदा कर्ज मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु खाती रिकामी झाली असतानाही बँकांकडून कर्ज देण्यास टाळाटाळ होत असल्याचे प्रकार घडत आहेत. येत्या काळात शेतीसाठी पैशांची गरज पडणार असल्याने शेतकरी पुन्हा खाससगी सावकारीच्या फाशात ओढला जाण्याची शक्यता अधिक गडद झाली आहे.

जिल्हा बँक पुढे...

धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला यंदा ७१ कोटी ६४ लाख रुपयांच्या कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. परंतु बँकेने ११ हजार १७२ शेतकऱ्यांना ९७ कोटी २२ लाख ९३ हजार रुपयांचे कर्ज वाटप आतापर्यंत केले आहे. उद्दिष्टापेक्षा ३५ टक्के अधिक कर्जवाटप करीत बँकेने नवीन विक्रम केल्याचे सांगण्यात आले आहे.

राष्ट्रीयीकृत बँका फेल

जिल्ह्यातील १२ राष्ट्रीयीकृत, खासगी आणि ग्रामीण बँकांच्या शाखांना यंदा ४९१ कोटी ९२ लाख रुपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. परंतु, बँकांनी २६ जुलैअखेरपर्यंत केवळ १५० कोटी ४७ लाख रुपयांचे कर्ज शेतकऱ्यांना वितरित केले आहे.

केवळ ३० टक्के हे कर्ज वाटप झाले आहे.

२० हजार शेतकऱ्यांना कर्ज : बँकांकडून एकूण २० हजार ६०६ शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. यात ११ हजार शेतकऱ्यांना जिल्हा बँकेने, तर ९ हजार ४३४ शेतकऱ्यांना राष्ट्रीयीकृत, ग्रामीण आणि खासगी बँकांनी कर्ज वाटप केले असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट करण्यात आले आहे.

जिल्ह्यात पीक कर्जवाटपाबाबत राष्ट्रीयीकृत बँकांकडून कायम उदासीनता दर्शविण्यात येते. यातून जिल्ह्यातील २० हजार शेतकऱ्यांना आतापर्यंत केवळ २४७ कोटी ६९ लाख रुपयांचे कर्ज देण्यात आले आहे. यात राष्ट्रीयीकृत बँकांकडून ११७ कोटी ४२ लाख, ग्रामीण बँकेच्या शाखांमधून ३ कोटी ७१ लाख, तर खासगी बँकांकडून २७ कोटी ३४ लाख रुपयांचे पीक कर्ज दिले गेले आहे. या सर्वात राष्ट्रीयीकृत बँकांची टक्केवारी ही २९ टक्के असून, सर्व बँकांच्या तळाशी राष्ट्रीयीकृत बँकांचा क्रमांक येत असल्याचे समोर आले आहे.