शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
5
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
6
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
7
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
8
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
9
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
11
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
12
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
13
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
14
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
15
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
16
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
17
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
18
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
19
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
20
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊन काळातही जगाचा पोशिंदा अनलॉकच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:31 IST

मागील १४ महिन्यांपासून जगावरील कोरोना महामारीचे संकट जाता जात नाही. सुरुवातीला एक दिवस जनता कर्फ्यूनंतर टप्प्याटप्प्याने शासनाने लॉकडाऊन केल्याने ...

मागील १४ महिन्यांपासून जगावरील कोरोना महामारीचे संकट जाता जात नाही. सुरुवातीला एक दिवस जनता कर्फ्यूनंतर टप्प्याटप्प्याने शासनाने लॉकडाऊन केल्याने सर्व उद्योगधंदे ठप्प झाले होते. मात्र, जगाचा पोशिंदा शेतकरी राजा स्वतःवर कितीही संकट आले तरी आपली कामे सुरळीतपणे चालू ठेवत आपल्या अन्नधान्यावर अवलंबून राहणाऱ्यांसाठी आपले कर्तव्य पार पाडत आहे.

गेल्यावर्षी कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन काळात शेतकऱ्यांच्या मालाला कवडीमोल भाव मिळाला होता. एकरी ६० ते ७० हजार रुपये खर्च करून लोकांनी पपई व केळीचे पीक घेतले होते. मात्र, त्यावेळेस खर्चही निघाला नव्हता. तसेच ऑक्टोबर महिन्यात अवकाळी पाऊस, डिसेंबरमध्येही अवकाळी पाऊस, तसेच मार्च महिन्यात गारपीट अशा अनेक संकटांमुळे शेतकरी राजा आर्थिक विवंचनेत सापडला आहे. मात्र, तरीही या सगळ्या गोष्टींचा विचार न करता आपण लावलेल्या मालाला भाव मिळेल की नाही? लॉकडाऊन काळात उत्पन्न निघाले तर तो माल विकला जाईल की नाही? यासारख्या असंख्य प्रश्नांचा शेतकरी विचार न करता आपले कर्तव्य पार पाडीत आहे.

मागील दोन वर्षांपासून जिल्ह्यासह सगळीकडे जोरदार पाऊस झालेला आहे. त्यामुळे उन्हाळ्यातही विहिरी, तसेच कूपनलिकांना मुबलक पाणी आहे. सध्या लॉकडाऊन काळातही जयनगरसह परिसरातील कोंढावळ, वडाळी, धांद्रे, निंभोरे, बोराळे या गावांमधील बहुसंख्य शेतकरी आपल्या शेतामध्ये पपई, केळी, ऊस यासारखी पिके लावण्यावर भर देत आहेत.

लॉकडाऊन काळात सर्व उद्योगधंदे बंद पडले तरी शेती हा असा व्यवसाय आहे की, तो कधीही बंद पडत नाही. मागीलवर्षी आमच्या केळी, पपई पिकाला अपेक्षित भाव मिळाला नसला तरी आम्ही सध्या लॉकडाऊन काळातही या पिकांची लागवड करीत आहोत.

- वैभव राजू पाटील, शेतकरी, जयनगर, ता. शहादा.