दुर्गम भागातील गावांना तंटामुक्ततीसाठी प्रोत्साहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 12:16 IST2020-06-18T12:16:22+5:302020-06-18T12:16:32+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत सहभागी होण्यासाठी अक्कलकुवा आणि धडगाव भागातील गावांना प्रोत्साहीत करावे. ...

Encouragement for conflict resolution in remote villages | दुर्गम भागातील गावांना तंटामुक्ततीसाठी प्रोत्साहन

दुर्गम भागातील गावांना तंटामुक्ततीसाठी प्रोत्साहन


लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत सहभागी होण्यासाठी अक्कलकुवा आणि धडगाव भागातील गावांना प्रोत्साहीत करावे. त्यासाठी नागरिकांना मोहिमेबाबत सविस्तर माहिती देण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयत आयोजित तंटामुक्त गाव मोहिम अंतर्गत कार्यकारी समितीच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, तृप्ती धोडमिसे, जिल्हा सरकारी वकील सुशील पंडीत आदी उपस्थित होते.
डॉ.भारुड म्हणाले, तंटामुक्तीमुळे प्रशासनावरील ताण कमी होण्याबरोबरच गावातही विकासाला पोषक वातावरण तयार होते. त्यामुळे ग्रामपंचायतींना प्रोत्साहित करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा. मूल्यमापन समित्यांचे प्रशिक्षण स्थानिक स्तरावर घेवून संबंधित अधिकाऱ्यांनी आवश्यक कार्यवाही त्वरीत पूर्ण करावी. गावपातळीवर मोहिमेची माहिती झाल्यास गावांचा सहभाग वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पोलीस अधीक्षक पंडीत म्हणाले, जिल्ह्यातील २८० ग्रामपंचायती तंटामुक्त झालेल्या नाहीत. या गावात क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी ग्रामसेवक आणि संरपंचांना मोहिमेत सहभागी होण्यासाठी प्रवृत्त करावे. अधिकाºयांनी विहीत मुदतीत मूल्यमापन प्रक्रीया पूर्ण करावी. यावेळी जिल्हा सरकारी वकीलांनीदेखील मार्गदर्शन केले. बैठकीस समितीचे सदस्य उपस्थित होते.

Web Title: Encouragement for conflict resolution in remote villages