शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
Latest Marathi News LIVE Updates: सम्राट चौधरी बनले बिहारचे नवे मुख्यमंत्री; राज्यपालांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ
3
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
4
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
5
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
6
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
7
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
8
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
9
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
10
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
11
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
12
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
13
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
14
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
15
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
16
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
17
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
18
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
19
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
20
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचा-यांना लसीकरणाचे भान, मिळाले नंदुरबारला तिसरे स्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2021 12:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२ टक्के असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात लसीकरणाचा वेगही समाधानकारक असल्याचे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२ टक्के असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात लसीकरणाचा वेगही समाधानकारक असल्याचे समोर आले आहे. नाशिक विभागातून जिल्हा तिस-या क्रमांकावर असून प्रथम क्रमांक धुळे जिल्ह्याने पटकावले आहे. नंदुरबार जिल्ह्यात सात सेंटर्सवर दैनंदिन लसीकरणाची टक्केवारी ही ७७ टक्के असल्याचे विभागाकडून कळवण्यात आले आहे. तर शेजारील धुळे जिल्हा १११ टक्के कामगिरीसह पुढे आहे.              सुमारे ११ हजार ६०७ शासकीय आणि खाजगी वैद्यकीय अधिकारी, तंत्रज्ञ कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा यांना कोरोव्हॅक्सीन ही लस दिली जाणार असल्याने त्यांची माहिती ॲपवर भरुन देण्यात आली होती. यातील वयाने कमी आणि शारिरिक क्षमता अधिक सक्षम असलेल्या कर्मचा-यांना जिल्ह्यात प्रथम मान देत लसीकरणाचा प्रारंभ करण्यात आला होता. या लसीकरणाला जिल्ह्यात चार ठिकाणी सुरुवात करण्यात आली होती. परंतू दैनंदिन ४०० लाभार्थींना लस देण्याचे उद्दीष्ट्य ठेवण्यात आले होते. परंतू अनेकांनी लसीकरणाला दांडी मारल्याने १०० लस देण्याचे उद्दीष्ट्य अपूर्ण राहत असल्याचे दिसून आले होते. यातून आणखी तीन ठिकाणी लसीकरण केंद्र सुरु करण्यात आल्यानंतर दिवसभरात ७०० जणांना लस देण्याचे उद्दीष्ट्य समोर आले होते.  २८ जानेवारी रोजी नंदुरबार जिल्ह्यात ७०० पैकी केवळ ४८० जणांचे लसीकरण झाले आहे. 

अंगणवाडी सेविका आणि मतदनीसांची होतेय जनजागृती लस घेतल्यानंतर किरकोळ ताप आणि इतर लक्षणे समोर आली आहेत. यातून काही आरोग्य कर्मचारी लस घेण्यासाठी येत नसल्याने दैनंदिन कोटा पूर्ण होण्यास अडचणी येत आहेत. परिणामी आरोग्य विभागाकडून आता अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना लसीकरणासाठी पाचारण करण्याची तयारी करण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण २ हजार ४४० अगणवाडी सेविक आणि मदतनीस आहेत. त्यांच्या लसीकरणाने जिल्ह्यातील लस घेणा-या महिलांची टक्केवारी वाढणार आहे. आरोग्य विभागातील विविध संवर्गात काम करणा-या महिलांनाही लसीकरण करण्याच्या सूचना आहेत. 

कोरोना लसींचा दुसरा डोस आरोग्य विभागाला प्राप्त 

  • पहिल्या टप्प्यातील लसीकरण झाल्यानंतर दुस-या टप्प्यातील लसीकरण सुरु होणार आहे. यासाठी दुस-या टप्प्यातील एकूण १० हजार ५०० डोस जिल्ह्याला मिळाले आहेत. यानुसार कामकाज होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. 
  • जिल्ह्याला पहिल्या टप्प्यात १२ हजार ५०० डोस देण्यात आले होते. एकूण ११ हजार ६०७ लाभार्थींना हे डोस द्यायचे आहेत. आजअखेरीस जिल्ह्यातून ३ हजार ३६८ जणांचे लसीकरण झाले आहे. पहिल्या टप्प्यातील १२ हजार ५०० आणि दुस-या टप्प्यात १० हजार ५०० अशा एकूण २३ हजार लसींचा साठा सध्या आरोग्य विभागाकडे आहे. 
  • लसीकरणात वाढ करण्यासाठी आरोग्य विभाग सातत्याने प्रयत्न करत असल्याचे सांगण्यात आले आहे. यात प्रामुख्याने आरोग्य कर्मचा-यांचे समुपदेशन करण्यावर भर देण्यात आला आहे.   

दर दिवसाच्या लसीकरण उद्दीष्टानंतर ठरवले जाते रँकिंग (संदर्भ: २८ जानेवारी)

धुळे -१११ %नाशिक-८९.०९%नंदुरबार-७७.००जळगाव-६१.०८%अ.नगर-६०.२६%

जिल्ह्यात लसीकरण करण्यासाठी तीन नवीन सेंटर्स काढले आहेत. दर दिवशी ७०० जणांचे लसीकरण होईल असे नियोजन केले आहे. लसीकरण वाढवण्यासाठी सर्वच स्तरावरुन प्रयत्न करत आहोत. -डाॅ. एन.डी.बोडके,जिल्हा आरोग्य अधिकारी, नंदुरबार.