शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

भूषा येथे नर्मदा नदीकिनारी पोलिसांकडून सुरक्षा उपायांवर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 11:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : धडगाव तालुक्यातील भूषा येथे गेल्या वर्षी मकर संक्रातीला बोेट उलटून सात जणांचा मृत्यू झाला ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : धडगाव तालुक्यातील भूषा येथे गेल्या वर्षी मकर संक्रातीला बोेट उलटून सात जणांचा मृत्यू झाला होता़ या घटनेच्या पार्श्वभूमीव यंदा याठिकाणी पोलीस दलाकडून विविध उपाययोजनांवर भर दिला जात आह़े़ यानिमित्त येथे पोलीस उपअधिक्षक पुंडलिक सपकाळे यांनी भेट देऊन पाहणी केली़पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांच्या सूचनेनुसार याठिकाणी विविध उपाययोजना करण्यासह भूषा आणि खर्डी ग्रामस्थांच्यावतीने स्वच्छताही करण्यात आली आहे़ यात प्रामुख्याने येणाऱ्या हजारो भाविकांसाठी बॅरिकेटींग करण्यात आले आहे़ दरवर्षी मकर संक्रांतीला भूषा येथे नर्मदा नदीत स्रान करण्यासाठी दुर्गम व अती दुर्गम भागातील आदिवासी बांधव हजेरी देतात़ अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या या परंपरेत सहभागी होण्यासाठी दरवर्षी भाविकांची संख्या वाढत असल्याने याठिकाणी विविध सुविधा अपुºया पडू लागल्या आहेत़ गेल्या वर्षी संक्रातीनिमित्त याठिकाणी नर्मदेचे जलपूजन करण्यासाठी बोटमध्ये बसून दुसºया किनाºयावर जाणाºया भाविकांचा अपघात झाला होता़ बोट उलटून तब्बल बालिका आणि महिलेचा मृत्यू झाला होता़ तसेच इतर अनेक जण जखमी झाले होते़ या अपघाताची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाने यंदा कंबर कसली आहे़रविवारी पोलीस उपअधिक्षक सपकाळे यांनी भूषा येथे भेट देऊन पट्टीचे पोहणारे तसेच ग्रामस्थ यांच्यासोबत चर्चा करुन बोटी, उपलब्ध साधने यांची माहिती घेतली़ पोलीसांकडून उभारले जाणारे माहिती कक्ष, भाविकांसाठीच्या सोयी, रस्ते, पार्किंग यांची माहिती घेतली़ याठिकाणी किमान ५० हजारापेक्षा अधिक नागरिक येणार असल्याची शक्यता असल्याने पोलीस दलाकडून विशेष उपाययोजना आखल्या जाणार आहेत़ सोबतच महसूल प्रशासनही येथे कर्मचारी नियुक्त करणार आहे़ आरोग्य विभागाच्या बोटींची याठिकाणी नियुक्ती होणार आहे़ यातून भाविकांसाठी फिरत्या आरोग्य पथकांची निर्मिती करण्यात आल्याची माहिती आहे़ गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस दलाची पथके याठिकाणी १५ जानेवारी तैनात राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे़