शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर प्रशासनाकडून भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:31 IST

तहसीलदार गिरीश वखारे, नगराध्यक्ष अजय परदेशी, पोलीस निरीक्षक पंडित सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली. बैठकीस नगरसेविका ...

तहसीलदार गिरीश वखारे, नगराध्यक्ष अजय परदेशी, पोलीस निरीक्षक पंडित सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली. बैठकीस नगरसेविका अनिता परदेशी, कल्पना पाडवी, नगरसेवक सुभाष चौधरी, योगेश पाडवी, रामानंद ठाकरे, अमनोद्दीन शेख, हेमलाल मगरे, माजी नगरसेवक सतीवान पाडवी, राजू पाडवी, जालंधर भोई, नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय, संदीप परदेशी, पालिका प्रशासकीय अधिकारी राजेंद्र माळी, स्वच्छता निरीक्षक अश्विन परदेशी यांच्यासह व्यापारी उपस्थित होते.

बाजारात प्रवेश करण्यासाठी नागरिकांची गर्दी होत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सोशल डिस्टन्सचे पालन व्हावे याकरिता दुकानांचे वर्गीकरण करण्याबाबत व्यापाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. एकाच ठिकाणी चिनोदा चौफुली परिसरात भाजीपाला व फळे विक्रीची दुकाने सुरू करण्याबाबत चर्चा करण्यात आली. भाजी विक्रेते चंद्रशेखर चव्हाण यांनी पालिकेकडून आवश्यक त्या उपाययोजना होत नसल्याने व्यापाऱ्यांचे हाल होत असल्याचे बोलून दाखवले. लॉरी उपलब्ध नसल्याने खाली दुकान लावता येत नाही, मंडप आदींची व्यवस्था नसते. गेल्यावर्षी पालिकेकडून जागा भाडे म्हणून १० ऐवजी २० रुपयांची आकारणी केली होती. पालिकेने यंदा भाडेबाबत सवलत देणे गरजेचे असल्याचे यावेळी विक्रेत्यांनी सांगितले. नगराध्यक्षांनी यावर उत्तर देत पालिकेकडून यावेळी पावती दिली जाणार नसल्याचे सांगितले. तसेच मंगळवारपासूनच दुकानाचे स्थलांतर करून चिनोदा चौफुलीवर लावण्याबाबत चर्चा करण्यात आली. मात्र आवश्यक त्या उपाययोजनेसाठी वेळ देण्याची मागणी यावेळी विक्रेत्यांनी केली. त्या अनुषंगाने येत्या सोमवारपासून पालिकेकडून नियमावली आखून आवश्यक उपाययोजना करून या दुकानदाराना जागा उपलब्ध करून देण्याबाबत तहसीलदार यांनी सूचना केल्या. कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी हा निर्णय घेत असल्याचे तहसीलदार गिरीश वखारे यांनी यावेळी सांगितले.

शहरात बॅरिकेटींगचा विचार

सकाळच्या सुमारास तहसीलदार गिरीश वखारे, पोलीस निरीक्षक पंडित सोनवणे, पुरवठा निरीक्षक संदीप परदेशी, पालिकेचे स्वच्छता निरीक्षक अश्विन परदेशी यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शहरातील गर्दीच्या भागांना भेटी दिल्या. शहरात सर्वाधिक बाहेरून येणाऱ्या वाहनांना प्रतिबंध करण्यासाठी मुख्य रस्ते बॅरिकेटिंग करण्यासंदर्भात यावेळी तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांच्यात चर्चा झाली. यावेळी पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडूनदेखील गेल्यावर्षी राबवलेल्या उपाययोजनांची माहिती जाणून घेतली. शहरात वाहनांची मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून येत असल्याने वाहने लावून बाजारासाठी नागरिकांनी पायी यावे यासाठी बॅरिकेटिंग करणे अत्यावश्यक असल्याची चर्चा यावेळी करण्यात आली.