शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
3
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
4
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
5
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
6
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
7
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
8
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
9
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
10
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
11
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
12
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
13
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
14
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
15
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
16
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
17
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
18
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
19
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
20
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
Daily Top 2Weekly Top 5

अज्ञात वाहनाच्या धडकेने वीज कर्मचारी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 12:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शिरपूर-शहादा रस्त्यावर सोनवद गावाच्या फाट्यावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तालुक्यातील तोरखेडा येथील वीज वितरण ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शिरपूर-शहादा रस्त्यावर सोनवद गावाच्या फाट्यावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तालुक्यातील तोरखेडा येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात आॅपरेटर म्हणून कार्यरत असलेले सुरेश गुलाबराव नेरपगार-पाटील (४९) यांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री साडेआठ वाजेदरम्यान घडली.तोरखेडा येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयातील आॅपरेटर सुरेश गुलाबराव नेरपगार-पाटील हे रविवारी रात्री विद्युत रोहित्र व कार्यालयीन काम आटोपून मोटारसायकलीने घरी जात होते. शिरपूर-शहादा रस्त्यावर सोनवद गावाच्या फाट्यालगत शहाद्याकडून भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने ठोस दिल्याने त्यांच्या डोक्याला जबर मार बसल्याने त्यांचा मृत्यू झाला. शुक्रवारी सायंकाळी जोराच्या वादळासह पाऊस झाल्याने शिरपूर रस्त्यावर झाडे उन्मळून पडली आहेत. ही झाडे अद्यापही न उचलण्यात आल्याने वाहतुकीला अडथळा ठरत आहेत. गेल्या दोन-तीन दिवसापासून विद्युत रोहित्र खराब होत असल्याने कमी-जास्त दाबाचा वीजपुरवठा होत आहे. वीज कंपनीचे कर्मचारी मेहनत घेऊन वीजपुरवठा सुरळीत करीत आहेत. सुरेश नेरपगार-पाटील यांनीही रविवारी दिवसभर काम करून रात्री घरी जात होते. घटनेचे वृत्त कळताच कुुकावल, कोठली व शहादा येथील वीज वितरण कंपनीचे कर्मचारी व नातेवाईक घटनास्थळी पोहोचले होते. सुरेश पाटील हे कुकावल येथील रहिवासी होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे. अपघाताची सारंगखेडा पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.