खांडबारात वीज चोरी उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 12:52 IST2020-01-14T12:52:08+5:302020-01-14T12:52:14+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : खांडबारा येथे मिटरमध्ये फेरफार करून एक लाख १३ हजारांची वीज चोरी करणाऱ्या एकाविरुद्ध विसरवाडी ...

Electricity theft exposed in Khandbar | खांडबारात वीज चोरी उघड

खांडबारात वीज चोरी उघड

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : खांडबारा येथे मिटरमध्ये फेरफार करून एक लाख १३ हजारांची वीज चोरी करणाऱ्या एकाविरुद्ध विसरवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खांडबारा येथील अमिर हारूनभाई मेमन यांनी आपल्या मिटरमध्ये फेरफार करून २४ महिन्यात सात हजार ६९ युनिटची वीज चोरी केली. त्याचा आकार तब्बल एक लाख १३ हजार ५०५ रुपये इतका आहे. वीज वितरण कंपनीच्या भरारी पथकाने धाड टाकून ही वीज चोरी उघडकीस आणली. याबाबत गजानन वसंत कोष्टी यांनी फिर्याद दिल्याने विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार चौरे करीत आहे.

Web Title: Electricity theft exposed in Khandbar