शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात विजेचा खेळखंडोबा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:19 IST

तोरखेडा :- ग्रामीण भागात सद्या एक तासाच्या अंतराने वीज गायब होत असल्यामुळे जनता त्रस्त झाली आहे. सध्या पावसाचा लपंडाव ...

तोरखेडा :- ग्रामीण भागात सद्या एक तासाच्या अंतराने वीज गायब होत असल्यामुळे जनता त्रस्त झाली आहे. सध्या पावसाचा लपंडाव सुरू असून, उन्हाचा पाराही चढल्याने जनतेची अगोदरच लाहीलाही होत असताना विजेचे अघोषित भारनियमन जनतेला सळो की पळो करून सोडत आहे. याबाबत संबंधित विभागाकडून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता तार तुटला आहे, फॉल्ट झाला आहे, वरून बंद केले गेले आहे, असे उत्तर देऊन वेळ मारली जात आहे. वास्तविक पाहता पावसाळ्यापूर्वी प्री मान्सून कामे आटोपून दुरूस्तीचे सर्व सोपस्कार पूर्ण केले असतानाही नेहमी नेहमी फॉल्ट होतोच कसा याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहे.

शहादा तालुक्याच्या ग्रामीण भागात वीजवितरणच्या वेगवेगळ्या उपकेंद्रातून जनतेला वीज पुरविली जात आहे. अगोदर उन्हाळ्याचा विचार केला तर कडक उन्हातही विजेचे अघोषित भारनियमन न होता जनतेला घरगुती वापरासाठी वेळेवर वीज उपलब्ध होत गेली आहे. मात्र, उन्हाळा संपून पावसाळा सुरू होत नाही तोच विजेचे अघोषित भारनियमन सुरू करण्यात आले. यावर्षीच्या मृग नक्षत्रात तर थोडी हवा किंवा पावसाचे आगमन झाले तरी वीज बंद करून जनतेला वेठीस धरले गेले आहे. सद्या गेल्या १० ते १२ दिवसापासून पावसाचा लपंडाव सुरू असून, उन्हाळ्यासारखे ऊन तापत असताना विजेच्या अघोषित भारनियमनात अचानक वाढ झाली आहे. दिवसभरात तर अर्धा वेळ सुद्धा वीज टिकत नसल्याचे दिसून येत आहे. तासातासातून वीज गुल करून फॉल्ट झाला, वरून वीज बंद करण्यात आली, तार तुटला अशी वेगवेगळी कारणे दाखवून वेळेवर वीज भरणाऱ्या ग्राहकांना त्रास दिला जात आहे. मिनिटा मिनिटाने वीज बंद करून अकलेचे तारे तोडणाऱ्या या वीज कंपनीने जनतेची झोप उडवून दिली होती. फक्त वीज वसुली करण्यावर भर देणाऱ्या वीज वितरण कंपनीला सद्या ग्राहकांच्या सोईसुविधांचे कोणतेही सोयरसुतक नसल्याचे सध्या घडत असलेल्या प्रकारावरून दिसून येत आहे.

फ्युज टाकायला ग्रामीण भागात कर्मचारीच नाही

सद्या शहादा तालुक्यात वायरमनची संख्या कमी असल्याने एका वायरमनवर दोन-तीन गावांचा कार्यभार असल्याने व हे कार्यरत वायरमन शक्यतो मुख्यालयी हजरच राहत नसल्याने गावातील रोहित्रावरील साधा फ्युजही गेला तरी फ्यूज टाकण्यासाठी कर्मचारी हजर राहत नसल्याने असेही अनेक गावे कितीतरी वेळ अंधारात काढत आहेत. अनेक गावात झीरो वायरमन गावगाडा चालवली असल्याने एखाद्या वेळी त्याचा जीवाचे बरेवाईट झाल्यास जबाबदारी कोणाची? असेही बोलले जात आहे