शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

संडे स्पेशल मुलाखत- निवडणूक प्रक्रिया यंदा ‘हायटेक’मुळे सुटसुटीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 12:57 IST

ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया सुटसूटीत होण्यासाठी प्रत्येक तहसील कार्यालयात हेल्पडेस्क स्थापन केला आहे. त्यात इच्छूकांना ॲानलाईन सर्व माहिती मिळणार आहे. -बालाजी क्षीरसागर.

मनोज शेलारलोकमत न्यूज नेटवर्कयंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीपासून निवडणूक विभागाने अनेक बदल केले आहेत. त्यात ऑनलाईन प्रक्रिया हा मुख्य बदल आहे. याशिवाय सदस्य म्हणून उभे राहण्यासाठी किमान सातवी पास असणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील ८७ ग्रामपंचायींमध्ये पारदर्शक प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक शाखा सज्ज आहे. बदलेल्या स्वरूपाविषयी सर्व आवश्यक घटकांना प्रशिक्षण देखील यापूर्वीच दिले गेले असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी क्षीरसागर यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली.

यंदाच्या निवडणुकीत काय मुख्य बदल झाले आहेत?एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणावर राज्यात ग्रामपंचायत निवडणुका होत आहेत. त्यामुळे शासन आणि निवडणूक विभागाने अनेक बदल केले आहेत. त्यात मुख्य बदल हा थेट जनतेतून सरपंच निवडण्याऐवजी सदस्यांमधून सरपंच निवड होणार आहे. सरपंचपदाचे आरक्षण हे निवडणूकपूर्व काढले जात होते. ते आता निवडणुकीनंतर काढले जाणार आहे. सदस्य पदासाठी किमान सातवी पास ही अट नव्याने टाकण्यात आली आहे. ॲानलाईन सॅाफ्टवेअर प्रणालीतच संपुर्ण निवडणूक कामकाज होणार आहे. याशिवाय प्रत्येक तहसील कार्यालया इच्छुकांसाठी ‘हेल्पडेस्क’ निर्माण करण्यात आलेला आहे.अधिकारी, कर्मचाऱ्यांना नवीन प्रणालीच प्रशिक्षण दिले आहे का?जिल्हाधिकारी यांच्या सुचनेनुसार सर्व तहसीलदार, निवडणूक निर्णय अधिकारी व संबधीत कर्मचारी यांना नवीन ॲानलाईन सॅाफ्टवेअर प्रणालीचे प्रशिक्षण दिले गेले आहे. त्याचे बारीकसारीक तपशील सांगण्यात आले आहेत. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेदरम्यान फारशा अडचणी येतील असे वाटत नाही. या सर्व बाबींसाठी नागरिकांचे व राजकीय पक्षांचेही सहकार्य अपेक्षीत आहेच.

हेल्प डेस्कची स्थापना... ॲानलाईन प्रक्रियेसंदर्भात इच्छूक उमेदवारांना अडचणी येऊ नयेत यासाठी प्रत्येक तहसील कार्यालयात हेल्पडेस्क स्थापन करण्यात आला आहे. तेथे जाऊन शंका निरसन करता येणार आहे. आधी अर्ज आणि आवश्यक घोषणापत्र, दाखले ॲानलाईन अपलोड करावे लागतील. त्यानंतर त्यांची प्रिंट काढून ते जमा करावे लागणार आहेत. त्यासाठी ३० डिसेंबरची मुदत आहे. सातवी पासची अट... सातवी पासची अट नव्याने टाकण्यात आली आहे. १९९५ नंतर जन्मलेल्यांसाठी ती असूनया निर्णयाची माहिती सर्वांपर्यंत पोहचावी यासाठी सुचना केल्या आहेत.निष्पक्ष वातावरणात निवडणुका... ग्रामपंचायत निवडणुका खुल्या वातावरणात पार पडाव्या यासाठीचे नियोजन झाले आहे. आचारसंहितेचेही काटेकोर पालन केले जात आहे. यासाठी सर्व निवडणूक अधिकाऱ्यांना सुचना दिलेल्या आहेत.