शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
4
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
5
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
6
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
7
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
8
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
9
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
10
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
11
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
12
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
13
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
14
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
15
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
16
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
17
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
18
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
19
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
20
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारातील वृद्ध महिलेचा कोरोनामुळे मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 18:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ८० वर्षीय वृद्धेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर तिचा मृत्यू ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ८० वर्षीय वृद्धेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर तिचा मृत्यू झाल्याने नंदुरबारात खळबळ उडाली आहे. अहवाल येताच यंत्रणेने तातडीने वृद्धा राहत असलेला अहिल्यादेवी चौक परिसर सील केला आहे. याशिवाय आधीच सील केलेले रुग्णालयाचा परिसरातही प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता २१ झाली असून त्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे तर पाच जण बरे होऊन त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.नंदुरबारातील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ८० वर्षीय महिलेचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. या महिलेचा अहवाल शुक्रवारी दुपारी पॉझिटिव्ह आल्यानंतर एकच धावपळ उडाली. महिलेला व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. दुपारीच या महिलेचा मृत्यू झाल्याचे जिल्हा रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले.ही महिला नंदुरबारातील अहिल्या देवी विहिर चौकात राहणारी आहे. त्यामुळे तातडीने या भागात प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली. प्रांताधिकारी वसुमना पंत, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार, तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्यासह आरोग्य अधिकाऱ्यांच्या टिमने या भागात बॅरिकेटींग लावून परिसर सील केला. शिवाय पालिकेतर्फे तातडीने सॅनिटाईज देखील करण्यात आले.या महिलेच्या संपर्कातील नातेवाईकांना लागलीच क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. शिवाय महिलेच्या संपर्कातील इतर व्यक्तींचाही शोध घेतला जात आहे. महिलेच्या मृत्यूमुळे जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या मृत्यूची संख्या ही दोन झाली आहे. तर एकुण रुग्णसंख्या २१ झाली आहे. त्यापैकी पाच जण कोरोनामुक्त झाले आहेत.