शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
2
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
3
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
4
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
5
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
6
उल्हासनगरातील नेताजी चौकात मुलीच्या वादातून राडा, तरुणांच्या पोटात चाकू खुपसून जीवेठार मारण्याचा प्रयत्न 
7
'मला दाखवला तो मुलगा हीरोसारखा होता, हा तो नाहीच', मांडवात वधूचा धिंगाणा, थेट पोलीसच बोलावले, मग...
8
Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... 
9
८ मुलांची आई जावयासोबत फरार; मेहंदीच्या बहाण्याने शेतात भेटले अन् दुचाकीवरून पळाले!
10
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
11
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
12
पेट्रोलमध्ये ८५ टक्के इथेनॉलच्या चर्चेने 'हा' शेअर सुसाट; नितीन गडकरींच्या मुलाची आहे कंपनी
13
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
14
भारताच्या 'या' राज्यात सापडला दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जिवंत बॉम्ब; लष्कराच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!
15
तीन बायका करामत ऐका! साध्या शिपायाने केला असा खेळ, पत्नी, मेहुणी, सासू अन् मैत्रिणींना...  
16
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹१,०५,९८३ चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटीही
17
"लाईफ जॅकेट दिले तरी लोकांनी घातले नाहीत"; जबलपूर क्रूझ अपघातावर कॅप्टनने रडत मागितली माफी
18
"राजा बेटा उठ ना...", आईला बिलगलेल्या त्रिशानच्या मृतदेहाजवळ बापाचा टाहो; ऐकून काळजाचं पाणी होईल! 
19
अमेरिकन कंपनीचा खेळ खल्लास! रातोरात लागणार टाळे; ट्रम्प यांनीही वाचवण्याचे प्रयत्न केले नाहीत
20
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
Daily Top 2Weekly Top 5

विसरवाडीत आठ हजार कोंबड्या नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:47 IST

विसरवाडी/नवापूर : शहरातील महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठे किलिंग ऑपरेशन संपल्यानंतर बर्ड फ्लूची लागण नवापूर तालुक्यातील विसरवाडी ग्रामीण भागात झाली ...

विसरवाडी/नवापूर : शहरातील महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठे किलिंग ऑपरेशन संपल्यानंतर बर्ड फ्लूची लागण नवापूर तालुक्यातील विसरवाडी ग्रामीण भागात झाली आहे.

विसरवाडी येथील जावेद पोल्ट्रीचा बर्ड फ्लूचा अहवाल भोपाल प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. त्याचा रविवारी पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्याने तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी दुपारी पशुसंवर्धनाचे २५ पथक पाठवून किलिंग ऑपरेशनला प्रत्यक्ष सुुरुवात केली आहे.

जावेद पोल्ट्री फॉर्ममध्ये एकूण आठ हजार ३०८ कुक्कुट पक्षी असून, ४० हजार ४२० अंडी आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागातील १२ पथकाच्या माध्यमातून किलिंग ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. उर्वरित दोन पोल्ट्रीमधील १२ हजार ५८६ कोंबडीचे किलिंग ऑपरेशन उद्या सोमवारी सकाळी राबविण्यात येणार आहे.

जावेद पोल्ट्री फार्मपासून एक किलोमीटर परिसर बाधित क्षेत्र म्हणून प्रशासन घोषित करणार आहे, अशी माहिती तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी दिली. या परिसरात बंगलावाला व जावेद अश्या दोन पोल्ट्री फार्म आहेत. या दोन्ही पोल्ट्रीत साधारण १० हजार कुकुट पक्षी आहे. या पोल्ट्रीत पक्ष्यांची मरतूक नसल्याने तेथील पक्षांचे अहवाल तपासणीसाठी भोपाल प्रयोगशाळेत पाठवण्यात आले नाही. विसरवाडी परिसरामध्ये बर्ड फ्लू नियंत्रणासाठी उपाययोजना केल्या जात आहे. एक किलोमीटर परिसरातील चिकन व अंडी विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.

नवापूर परिसरातील एकूण २२ पोल्ट्रीतील पाच लाख ७८ हजार कुक्कुट पक्षी व २५ लाख अंडी नष्ट करण्यात आली आहेत तर उर्वरित पाच ते सहा पोल्ट्रीत लाखो पक्षी व अंडी आहेत. तेथील अहवाल तीन वेळा निगेटिव्ह आल्याने येथील कुक्कुट पक्ष्यांचे कलिंग ऑपरेशन करण्यात आले नाही.

नुकसान भरपाई लवकर मिळावी

नवापूर परिसरातील २२ पोल्ट्री फार्ममधील किलिंग ऑपरेशन संपल्यानंतर प्रशासनाने पशुसंवर्धन विभागाच्या पथकामार्फत पोल्ट्री व्यावसायिकांना पोल्ट्रीतील कुकुट पक्षी विष्टा, पशुखाद्य गोदाम निर्जंतुकीकरण करण्याचे आदेश दिल्याने पशुसंवर्धन विभाग व पोल्ट्री व्यावसायिकांनी पोल्ट्री निर्जंतुकीकरणासाठी सुरुवात केली आहे. नवापूर परिसरातील पोल्ट्री व्यावसायिक लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी यासाठी शासनाकडे सारखा तगादा लावत आहे. शासनाने लवकर नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी पोल्ट्री व्यावसायिकांनी केली आहे.

बर्ड फ्लू होऊ नये याकडे लक्ष द्यावे

नवापूर शहरात राज्यातील सर्वात मोठे किलिंग ऑपरेशन करण्यात आले. या दरम्यान लाखो पक्षी व लाखो अंडी नष्ट करण्यात आलेली आहे. नवापूर परिसरातील पाच ते सहा पोल्ट्रींचा अहवाल निगेटिव्ह आल्याने तेथे लाखो पक्षी व अंडी आहेत. बर्ड फ्लूची लागण होऊ नये. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. नवापूर परिसरातील चार-पाच लाख कुकुट पक्षी सुरक्षित आहेत. या संदर्भामध्ये पशुसंवर्धन विभाग व महसूल विभागाने पोल्ट्री व्यावसायिकांची बैठक घेऊन बर्ड फ्लू संदर्भात उपायोजनाच्या सूचना केल्या आहेत.

गुजरात सीमावर्ती भागात विशेष काळजी घ्यावी

गुजरात राज्यातील उच्छल परिसरातील नॅशनल पोल्ट्रीत बर्ड फ्लूचा धोकेदायक एच ५ एन १ विषाणूचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने नवापूर परिसरातील आजूबाजूच्या पोल्ट्री व्यवसायिकांची धडकी भरली आहे. पोल्ट्रीतील १७ हजार कुकुट पक्षी गुजरात राज्यातील पशुसंवर्धन विभागाने नष्ट केली आहे. तरीदेखील परिसरात उपाययोजना केल्याने पक्षांना त्याची लागण होणार नाही याकडे व्यावसायिकांनी लक्ष देणे गरजेचे आहे. अश्या सूचना पशुसंवर्धन विभागाचा अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.