शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
4
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
5
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
6
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
7
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
8
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
9
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
10
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
11
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
12
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
13
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
14
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
15
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
16
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
17
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
18
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
19
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
20
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
Daily Top 2Weekly Top 5

तुळाजातील ‘दुर्गा’ झाली फौजदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 12:43 IST

हंसराज महाले । लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : मनात काहीतरी करण्याची प्रबळ इच्छाशक्ती असली व आई-वडिलांच्या स्वप्नपूर्तीचे ध्येय डोळ्यासमोर ...

हंसराज महाले ।लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : मनात काहीतरी करण्याची प्रबळ इच्छाशक्ती असली व आई-वडिलांच्या स्वप्नपूर्तीचे ध्येय डोळ्यासमोर असेल तर प्रतिकूल यशाला सहज गवसणी घालता येते. यांचा वस्तुपाठ तालुक्यातील तुळजा येथील दुर्गा खर्डे हिने घालून दिला आहे. राज्य राज्यसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत दुर्गा खर्डे हिने यश मिलविले असून, आई-वडिलांची स्वप्नपूर्ती करत ती फौजदार झाली आहे.सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या तळोदा तालुक्यातील दुर्गम भागातील तुळजा येथील मगन खर्डे व विमलबाई खर्डे यांची दुर्गा ही द्वितीय कन्या असून, लहान पणापासूनच दुर्गा ही अभ्यासात हुशार होती. दुर्गाचे मामा मनीलाल नावडे हे शिक्षक असल्याने घरात लहानपणापासून शैक्षणिक वातावरण होते. मुलांच्या शिक्षणाकडे आई-वडिलांनी कटाक्षाने लक्ष देऊन त्यांच्या तिन्ही मुलांना शिकविले. मोठा मुलाला राज्य परिवहन विभागांमध्ये मॅकेनिक म्हणून नोकरीला लावले तर दुर्गा पेक्षा मोठी कन्यादेखील परिचारिका म्हणून नोकरीला लावले होते. परंतु लहान मुलगी दुर्गा हिने पोलीस अधिकारी व्हावे ही अशी मगन खर्डे व विमलबाई खर्डे यांची इच्छा होती. ती ईच्छा दुर्गा ने मेहनतीने अभ्यास करून पूर्ण केली आहे.दुर्गाचे पहिली ते सातवी पर्यंतचे शिक्षण हे तळोदा तालुक्यातील राणीपूर येथील शासकीय आश्रम शाळेत झाले. आठवीपासून ते दहावीपर्यंतच्या माध्यमिक शिक्षण दुर्गाने धुळे येथील कन्या विद्यालयात घेतले. अकरावी व बारावीचे शिक्षण विज्ञान शाखेतून तळोदा येथील न्यू हायस्कूलमध्ये घेतले तर शहादा येथील वसंतराव नाईक महाविद्यालयातून दुर्गाने इंग्रजी विषयाची पदवी मिळवली. यानंतर तिने हिंदी विषय घेत जीटीपी महाविद्यालयातून एम.ए देखील केले.शिक्षण घेत असतांना दुर्गाला स्पर्धा परीक्षेची आवड होती. त्यादृष्टीने ती अभ्यासाची तयारी देखील करत होती. याच दरम्यान ती ट्राईबल टॅलेंट सर्च फाऊंडेशनच्या मार्गदर्शन सत्रात सहभागी झाली. ट्राईबल टॅलेंट सर्च फाऊंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेची प्रवेश परीक्षा ती प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली त्यामुळे तीला फाऊंडेशनकडून तीच्या पुढील अभ्यासासाठी व मार्गदर्शनाची व्यवस्था करण्यात आली. तीला पुढील अभ्यासासाठी फाउंडेशनच्या वतीने जळगाव येथील खाजगी (दीपस्तंभ) स्पर्धा परीक्षा केंद्रात प्रवेशित करण्यात आले. पहिल्या प्रयत्नात दुर्गा ही पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाली होती. मात्र शारीरिक चाचणी उत्तीर्ण न झाल्यामुळे दुर्गाची पहिल्याच प्रयत्नात निवड होऊ शकली नाही. मात्र दुसऱ्या प्रयत्नात नियोजनबद्ध अभ्यास व शारीरिक क्षमता वाढविल्याने दुर्गाने शेवटी पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण झाली व तिने आई वडिलांचे स्वप्न पूर्ण केले. दुर्गाच्या यशात आई-वडिलांसह तिचे मामा विषय शिक्षक मणीलाल नावडे व ट्राईबल टॅलेंटसर्च फाऊंडेशनचा मोलाचा वाटा आहे.दुर्गा खर्डेची ही यशोगाथा आश्रमशाळेत शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांसह महाविद्यालयीन शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांना अनेक वर्षांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.