रॉड तुटल्याने ट्रकची डंपर व मोटारसायकलींना धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 12:40 PM2020-02-19T12:40:43+5:302020-02-19T12:40:50+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तालुक्यातील लोणखेडा गावालगत शर्मा हॉटेलसमोर सोमवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास ट्रकच्या पुढील चाकाचे रॉड ...

Dumps of truck and motorcycle collided with rod breaks | रॉड तुटल्याने ट्रकची डंपर व मोटारसायकलींना धडक

रॉड तुटल्याने ट्रकची डंपर व मोटारसायकलींना धडक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : तालुक्यातील लोणखेडा गावालगत शर्मा हॉटेलसमोर सोमवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास ट्रकच्या पुढील चाकाचे रॉड तुटून चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने समोर असलेल्या डंपरसह दोन मोटारसायकली व एक ठेला गाडीला धडक दिल्याने वाहनांची मोडतोड झाली. या अपघातात जिवीतहानी झाली नसली तरी एका मोटारसायकलचा चुराडा झाला.
सोमवारी रात्री साडेनऊ ते दहा वाजेच्या सुमारास खेतियाकडून शहाद्याकडे येणाऱ्या ट्रकने (क्रमांक एम.पी.०९- एचजी ४२६०) लोणखेडा चौफुलीलागत असलेल्या शर्मा रेस्टारंटसमोर उभा असलेला डंपर (क्रमांक एम.एच.०४ ईएल-०९१२) रस्त्याच्या बाजूला उभा होता. त्याच्या पाठीमागे एक आमलेट व नाश्त्याची हातगाडीसह दोन मोटरसायकली उभ्या होत्या. या ट्रकचे पुढील चाकाचे रॉड तुटल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने डंपरसह मोटारसायकल व हातगाडीला धडक दिली. यात वाहनांसह हातगाडीचे नुकसान झाले. याबाबत शहादा पोलीस स्टेशनला अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Dumps of truck and motorcycle collided with rod breaks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.