शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
Top Marathi News Live: इराणने अमेरिकेला पाठवला नवा प्रस्ताव, पाकिस्तान मध्यस्थ
3
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
4
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
5
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
6
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
7
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
8
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
9
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
10
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
11
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
12
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
13
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
14
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
15
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
16
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
17
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
18
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
19
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
20
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
Daily Top 2Weekly Top 5

इंधन दरवाढीमुळे रिक्षाचालकांसोबत त्यांचे कुटुंबही करू लागले व्यवसाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:59 IST

नंदुरबार शहराचा विस्तार गेल्या काही वर्षात वाढला असल्याने रिक्षा चालकांची संख्या ही ५०० च्या घरात गेली आहे. प्रवासी संख्या ...

नंदुरबार शहराचा विस्तार गेल्या काही वर्षात वाढला असल्याने रिक्षा चालकांची संख्या ही ५०० च्या घरात गेली आहे. प्रवासी संख्या आणि प्रवासी मार्ग यांच्यात वाढ झाल्याने सर्वांनाच दिवसभरात दोन ते तीन हजार रुपयांची कमाई होत आहे. रिक्षाचा दिवसाचा मेंटेनन्स, इंधन दर यामुळे दिवसाला खर्च काढून घरी कुटुंबाचा उदरनिर्वाह चालेल एवढी रक्कम त्यांच्याकडून गोळा करण्यात येत होती. परंतु गेल्या काही दिवसात इंधनदरवाढीमुळे रिक्षा चालकांच्या दैनंदिन खर्चात वाढ होऊन आवक मात्र कमी झाली आहे. यातून मार्ग काढत काहींनी विद्यार्थी वाहतुकीचा तर काहींनी चारचाकीवर चालक म्हणून पार्टटाईम काम करण्याचा निर्णय घेत कामाला सुरुवात केली आहे. दुसरीकडे तीन चाकी रिक्षासोबतच शहरापासून २० किलोमीटर लांब असलेल्या गावांदरम्यान रिक्षा चालवणाऱ्यांचेही हाल होत आहेत. या रिक्षा चालकांच्या कुटुंबीयांकडून त्यांना साथ देण्यात येत असून ग्रामीण भागातील रिक्षा चालकांचे कुटुंब शेतात मजुरीला तर शहरी भागातील कुटुंबे घरगुती कामे करत आहेत. यात कोणी मेस चालवणे, शिलाई काम तसेच चहाची टपरी चालवत आहेत.

व्यवसायावर परिणाम

इंधन दरवाढ झाल्याने रिक्षा व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. वाढीव भाडे सांगितल्यास प्रवासी नकार देत त्यांची व्यवस्था करून घेतात. शहरात रिक्षा व्यवसायातही स्पर्धा असल्याने भाडेवाढ करण्याबाबत रिक्षाचालक उत्सुक दिसून येत नाहीत.

इतर कामांचा आधार

रिक्षा चालवणारे बहुतांश जण हे प्रशिक्षित चारचालक असतात. यातून प्रवासी चारचाकी वाहनांवर वर्दी मिळाल्यास दर दिवस या हिशेबाने चालक म्हणून काम करतात. यातून महिन्याकाठी काही पैसे येऊन घराच्या खर्चाला हातभार लागत असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.

पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे दैनंदिन खर्चात कपात करावा लागतो. रिक्षात पेट्रोल राहिल तर ती चालेल. कुटुंबात पत्नीकडून किरकोळ कामे करून हातभार लागत असल्याने दिलासा आहे. परंतु पुढे काय असा प्रश्न आहे.

-भटू रामराजे, रिक्षाचालक ,

शहरात रिक्षांची संख्या खूप झाल्याने दिवसभरात टाकलेल्या पेट्रोल आणि डिझेलचा खर्च निघणेही मुश्कील होते. अनेकवेळा इतर रिक्षाचालक हे दिवसभर प्रवाशांच्या प्रतीक्षेत असतात. विद्यार्थी वाहतूक करणारेही त्रस्त आहेत. दिवसभरात खर्च वजा जाता खूप थोडे पैसे रिक्षाचालक घरी घेऊन जातात. यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे.

-अनिल मराठे, रिक्षाचालक