शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
4
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
5
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
6
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
7
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
8
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
9
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
10
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
11
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
12
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
13
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
20
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे स्कूल बसचालकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न गंभीर, १४ महिन्यांपासून काम नाही; रोजंदारीचे कामही भेटेनासे झाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:34 IST

कोरोना महामारीमुळे शासनाने संचारबंदी लावल्यामुळे याचा परिणाम छोटे-मोठे व्यावसायिकांवर मोठ्या प्रमाणात झाला. परंतु मुलांना शाळेत शिकण्यासाठी घेऊन जाणारे ...

कोरोना महामारीमुळे शासनाने संचारबंदी लावल्यामुळे याचा परिणाम छोटे-मोठे व्यावसायिकांवर मोठ्या प्रमाणात झाला. परंतु मुलांना शाळेत शिकण्यासाठी घेऊन जाणारे स्कूल बसचे सारथी काम नसल्यामुळे सध्या घरीच असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शेतीमध्ये सध्या मशागतीची कामे चालू असल्याने मोलमजुरीवर पोट भरणारे बसचालक सध्या काम नसल्यामुळे दोनवेळच्या जेवणाची चिंता करताना दिसून येत आहे. मुलांना शाळेत आणि शाळेतून घरी आणणारे बसचालक १४ महिन्यांपासून बस घरी उभीच असल्यामुळे स्वतःच्या संसाराची बस कशी चालवायची? असा प्रश्न या चालकांना पडला आहे. दुसरीकडे संचारबंदीमुळे किराणा मालाचे भाव खूपच वाढले आहेत, म्हणून पोट भरण्यासाठी अनेक बसचालक घर बांधकामावर, शेतात ट्रॅक्टर चालवायला जात आहेत. मात्र जे बसचालक शेतात मजुरी करून उदरनिर्वाह चालवित होते ते सध्या शेतातील भुईमूग काढणी, ऊस, केळी, पपई लागवड आटोपल्यामुळे घरीच आहेत. आता पावसाळा सुरू झाल्याशिवाय त्यांच्या हाताला काम मिळणार नाही.

अनेक तरुणांनी नोकरी भेटत नसल्यामुळे बँकेचे कर्ज काढून स्कूल बस खरेदी केली आहे. गरजेनुसार त्यांनी अनेक शाळांवर मुले घेऊन जाण्याचे काम करायला सुरुवात केली होती. पालकांनीही सुरक्षिततेच्या दृष्टीने आपल्या पाल्यांसाठी स्कूल बस लावलेली होती. त्यामुळे अनेक तरुणांना रोजगार मिळाला होता. मात्र मागीलवर्षी कोरोनामुळे संचारबंदी लागली. संसर्ग वाढत गेल्याने बाजार, दुकाने अनेकदा बंद ठेवण्याची वेळ आली. मध्यंतरी रुग्ण संख्या कमी झाल्यावर दोन-अडीच महिने शाळा सुरू झाल्या. मात्र दुसऱ्या लाटेचा प्रसार जलद गतीने वाढल्यामुळे पुन्हा शाळा सरसकट बंद झाल्या. पुन्हा शाळेच्या गाडीबरोबर बसचालकांच्या उदरनिर्वाहाची गाडी बंद झाली. परिणामी बसचालकांवर पुन्हा उपासमारीची वेळ येऊन ठेपली.

शाळा बंद झाल्यामुळे मुले घरी बसून ऑनलाइन शिक्षण घेत होते. शिक्षण थांबले नाही, मात्र बसची चाके थांबल्याने बँकेच्या हप्त्याने घेतलेल्या गाडीचे हप्ते थांबले. गाडीचे हप्त्यांचे व्याजदर वाढत आहे. शाळा बंद झाल्या तरी लग्नासाठी, पर्यटनासाठी किंवा इतर कार्यक्रम ठिकाणी आपली गाडी चालेल, असे बस चालकांना वाटत होते. मात्र सार्वजनिक वाहतूकही शासनाने बंद केल्याने स्कूल बसेसची चाके रुतली आहेत.

स्कूल बस बंद असल्याने मिळेल ते काम करून बसचालक उदरनिर्वाह करीत होते. मात्र सध्या मजुरीचे काम मिळेल याची शाश्वती नाही. म्हणून शासनाने या स्कूल बस चालकांकडेही लक्ष देऊन काहीतरी आर्थिक सहाय्य करावे, अशा प्रतिक्रिया बसचालकांकडून व्यक्त होत आहेत.

१४ महिन्यांपासून वाहन बंद असल्याने हातांना काम नाही, म्हणून मिळेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहे. सध्या शेतातही काम नसल्यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न अधिकच गंभीर झाला आहे.

-कमलाकर कोळी, स्कूल बसचालक, कोठली, ता.शहादा