शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
4
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
5
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
6
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
7
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
8
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
9
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
10
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
11
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
12
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
13
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
14
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
15
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
16
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
17
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
18
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
19
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
20
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
Daily Top 2Weekly Top 5

काठीच्या राजवाडी होळीनिमित्त सातपुड्यात गुंजणार ढोल बिरीचे सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 22:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मोलगी : अक्कलकुवा शहराच्या उत्तरेला ४० किलोमीटर अंतरावर सातपुड्याच्या चौथ्या पर्वत रांगेतील संस्थानिकांचा समृद्ध वारसा असलेल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कमोलगी : अक्कलकुवा शहराच्या उत्तरेला ४० किलोमीटर अंतरावर सातपुड्याच्या चौथ्या पर्वत रांगेतील संस्थानिकांचा समृद्ध वारसा असलेल्या काठी ता़ अक्कलकुवा येथील राजवाडी होळीला सोमवारी सुरुवात होणार आहे़ यानिमित्त सातपुड्यात ढोल आणि बिरीचे सूर उमटू लागले असून जागोजागी पेटत असलेल्या होळीसमोर बावा, बुध्या, मोरखी बनून आदिवासी बांधून डौलात नृत्य करु लागले आहेत़गेल्या १५ ते २० दिवसांपासून सातपुड्याला होळीचे वेध लागले आहेत़ यामुळे सर्व आबालवृद्ध, युवक, युवती, माता भगिनींची उत्सुकता वाढली असून सर्वांची पावले आपआपल्या गावांकडे वळली आहेत़ यात सर्वाधिक आकर्षण असणारी राजवाडी होळी म्हणजे उत्सवाचा केंद्रबिंदूच आहे़ यानिमित्त भरणारा भोंगऱ्या बाजार आणि मेलादा सर्वांनाच भुरळ घालणारा आहे़ काठी संस्थानचा होलिकोत्सवाच्या पूजेचा मान पारंपरिक पद्धतीने संस्थानिकांचे वारस असलेल्या महेंद्रसिंग प्रतापसिंग पाडवी यांना देण्यात येतो़ १२ शतकापासून येथे साजरा होणारा होलिकोत्सव हा भव्य अशा प्रकारचा असल्याने हजारोंच्या संख्येने आदिवासी बांधव हजेरी लावतात़ या माध्यमातून आदिवासी संस्कृतीचे जतन होत असल्याने नर्मदा काठापासून तापी खोºयातील तीन राज्यातील आदिवासी बांधव येथे हजेरी लावतात़ यंदाही होळीच्या पार्श्वभूमीवर प्रचंड उत्साह असून होळीसाठी लागणारा दांडा आणणारे पुजारा चार दिवसांपूर्वीच गुजरात राज्यातून रवाना झाले आहेत़ मजल दर मजल करत हे बांधव सोमवारी दुपारी होळीचा दांडा घेऊन काठी गावाच्या वेशीवर येणार आहेत़ येथून पुढे गावातीलच जुन्या कडूनिंबाच्या झाडाजवळ बांूबू ठेवून त्याचे पूजन केले जाणार आहे़ यंदा होळीसाठी किमान १ लाखापेक्षा अधिक आदिवासी बांधव आणि विविध राज्यातील पर्यटकही हजेरी लावणार असल्याने मुख्य होळी चौकातील तयारीलाही वेग आला आहे़ होळीसाठी तयारी करणारे बावा, बुध्या, मोरखी यासह विविध पथकांची तयारी पूर्ण झाली असून सातपुड्यात सुरु असलेल्या होळीत त्यांचे नृत्य रंगत आहे़ पारंपरिक अशा ९०० वर्षांच्या या होलिकोत्सवासाठी पोलीस बंदोबस्त व वाहतूक नियमन करण्याची कारवाईही सुरु असल्याची माहिती देण्यात आली आहे़तूर्तास काठी परिसरात ढोल, डफ आणि घुंगरांचे सूर घुमत असून ते ऐकून प्रत्येकातच चैतन्य संचारत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे़