वाहनचालकांचे उत्पन्न घटले, खर्च वाढला; भागवायचे कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:29 IST2021-05-24T04:29:17+5:302021-05-24T04:29:17+5:30

नंदुरबार : कोरोना, लॉकडाऊन यासह इंधनाच्या वाढत्या किमती यामुळे वाहनांचा खर्च वाढला, परंतु उत्पन्न घटल्याचे चित्र आहे. यामुळे मात्र ...

Driver's income decreased, expenses increased; How to run | वाहनचालकांचे उत्पन्न घटले, खर्च वाढला; भागवायचे कसे?

वाहनचालकांचे उत्पन्न घटले, खर्च वाढला; भागवायचे कसे?

नंदुरबार : कोरोना, लॉकडाऊन यासह इंधनाच्या वाढत्या किमती यामुळे वाहनांचा खर्च वाढला, परंतु उत्पन्न घटल्याचे चित्र आहे. यामुळे मात्र अनेकांना महागडे वाहन घेऊन घरासमोरच उभे ठेवावे लागत असल्याचे चित्र आहे. यामुळे मात्र बँकांच्या कर्जाचा हप्ता भरावा लागत असल्याचे चित्र आहे.

कोरोना व लॉकडाऊनमुळे वाहने बाहेर काढणेदेखील जिकिरीचे झाले आहे. पोलिसांकडून तपासणी, वाहन खराब झाल्यास गॅरेज बंद, इंधनाचे वाढलेले दर, त्यामुळे मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. ही बाब लक्षात घेता वाहन मालक वाहने उभी ठेवणेच पसंत करीत आहेत. अनेक जणांनी तर व्यवसायासाठी बॅंकेतून, खाजगी सहकारी संस्थांकडून कर्ज काढले आहे. परंतु लॉकडाऊनमुळे व्यवसायच होत नसल्याने वाहन उभे व कर्जाचे हप्ते सुरू अशी स्थिती झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांना व चालकांना आता ते जिकिरीचे ठरत आहे.

Web Title: Driver's income decreased, expenses increased; How to run