ट्रॅक्टर अपघात प्रकरणी चालकाला दंडाची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 12:35 PM2020-01-14T12:35:59+5:302020-01-14T12:36:05+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : ट्रॅक्टर अपघातात दहा जणांना जखमी करणाऱ्या चालकाला शहादा प्रथमवर्ग न्यायालयाने दोषी ठरवत २७०० रुपयांचा ...

 Driver fined for tractor accident | ट्रॅक्टर अपघात प्रकरणी चालकाला दंडाची शिक्षा

ट्रॅक्टर अपघात प्रकरणी चालकाला दंडाची शिक्षा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : ट्रॅक्टर अपघातात दहा जणांना जखमी करणाऱ्या चालकाला शहादा प्रथमवर्ग न्यायालयाने दोषी ठरवत २७०० रुपयांचा दंड ठोठावला आहे.
तलावडी, ता.शहादा येथील किसन देहल्या पावरा याने ६ मे २०१७ रोजी आपल्या ताब्यातील ट्रॅक्टर व ट्रॉलीमध्ये मजुरांना बसवून जात होता. नागझिरीनजीक त्याचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर उलटले होते. त्यात प्रविण अंबरसिंग वळवी, दशरथ पवार, जिभाऊ सुकळे, गोटू ठाकरे, दिपक सुकळे, कपील पवार, रवींद्र पवार, काळूसिंग नाईक सर्व रा.ईस्लामपूर, ता.शहादा, जेहरसिंग नाईक, बारसिंग नाईक रा.लेंघापाणी हे जखमी झाले होते. याबाबत चालक किसन देहल्या पावरा याच्याविरुद्ध म्हसावद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हवालदार प्रदीप राजपूत यांनी शहादा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडे दोषारोपपत्र दाखल केले होते. न्यायालयाने चालक किसन पावरा यास दोषी ठरवत २७०० रुपयांचा दंड ठोठावला. सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड.जी.एम.बागुल यांनी काम पाहिले.

Web Title:  Driver fined for tractor accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.