शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
5
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
6
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
7
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
8
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
9
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
10
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
12
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
13
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
14
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
15
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
16
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
17
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
18
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
19
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
20
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
Daily Top 2Weekly Top 5

सर्वसामान्यांचे घरकुलाचे स्वप्नही आता आवाक्याबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:31 IST

मागील महिनाभरात बांधकाम साहित्याची भाववाढ तेजीत आहे. सिमेंट ५० किलो गोणीमागे २० ते ४० रुपयांपर्यंत तेजी येऊन ३८० ते ...

मागील महिनाभरात बांधकाम साहित्याची भाववाढ तेजीत आहे. सिमेंट ५० किलो गोणीमागे २० ते ४० रुपयांपर्यंत तेजी येऊन ३८० ते ४०० रुपये विकले जात आहे. स्टील किलोमागे आठ रुपयांनी भाव वधारून ६० ते ६२ रुपये किलोपर्यंत विकले जात आहे. लोखंडी पाइपचा भाव महिन्यापूर्वी ५८ रुपये किलो होता. यात तब्बल १२ रुपये वाढ होऊन ७० रुपये किलो विकले जात आहे. गुजरातमधील वाळूच्या भावात ३० टनाच्या गाडीमागे सहा हजार रुपये वधारून ४६ हजार रुपयात मिळत आहे. अनधिकृत वाळूतही सहा हजार वाढून २२ टनाची गाडी २५ ते २६ हजार रुपयांत मिळत आहे. मात्र, याला खडी व विटा अपवाद ठरल्या आहेत. बांधकाम व्यावसायिकांनी सांगितले की, साधारणतः एक हजार चौरस फूट बांधकामात सिमेंटच्या ६०० गोण्या, लोखंड चार हजार किलो, वाळू ४० ते ५० ब्रास, खडी २० ते ३० ब्रास व ३० ते ४० हजार विटा लागतात. यामुळे बांधकामाचा खर्च वाढला आहे. जर अशीच परिस्थिती राहिली, तर पुढील महिन्यापासून घराच्या किमती सुमारे १० ते २० टक्क्यांनी वाढतील.

वाळू ठेके बंदच्या फटका...

नंदुरबार जिल्ह्यातील तापी नदीकाठच्या वाळू ठेक्यांना शासनाने या वर्षी परवानगी न दिल्यामुळे गुजरात राज्यातील व धुळे जिल्ह्यातील वाळू नंदुरबार जिल्ह्यात बांधकामासाठी मागवली जात आहे. त्यामुळे अव्वाच्या सव्वा दराने ती वाळू उपलब्ध होत आहे, परंतु तीही वेळेवर न येता छुप्या पद्धतीने रात्रीतून अंधाराचा फायदा घेत, शासनाचा डोळा चुकवीत बांधकाम साइटवर टाकली जात आहे. त्यामुळेही बांधकामाचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे.

मागणी वाढल्यामुळे भाववाढ

सिमेंट व स्टील विक्रेत्यांच्या म्हणण्यानुसार, गणेशोत्सवापासून बांधकामांनी गती घेतली आहे. बांधकाम व्यावसायिकांना वेळेत बांधकाम पूर्ण करून घराचा ताबा ग्राहकांना द्यायचा आहे. तीन टक्के मुद्रांक शुल्क कमी झाल्याचा फायदा ग्राहकांना घ्यायचा आहे. यामुळे घरांना मागणी वाढली. परिणामी, बांधकाम साहित्याला मागणी वाढली. सरकारी कामांनीही गती घेतल्याने मागणी व पुरवठ्यात तफावत निर्माण झाली आहे.

व्यापाऱ्यांची एकाधिकारशाही

सिमेंट, लोखंडाच्या किमतीवर केंद्र व राज्य सरकारचे नियंत्रण नाही. यामुळे व्यापारी एकजूट होऊन मनमानी भाववाढ करतात. याचा फटका ग्राहकांना बसतो आहे. सरकारने सिमेंट व लोखंडाच्या किमती आटोक्यात राहण्यासाठी हस्तक्षेप करावा, अशी मागणी जोर धरत आहेत.