जिल्ह्यात ड्रॅगनफ्रूटचे क्षेत्र वाढविणार, कृषी विभागाकडून विशेष मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:30 IST2021-07-29T04:30:29+5:302021-07-29T04:30:29+5:30

ड्रॅगनफ्रूट हे एक निवडुंग परिवारातील अत्यंत महत्वपुर्ण फळ असून भारतीय बाजारपेठेमध्ये या फळाची मागणी व पिकाचे क्षेत्र वाढत आहे. ...

Dragonfruit area to be increased in the district, a special campaign by the Department of Agriculture | जिल्ह्यात ड्रॅगनफ्रूटचे क्षेत्र वाढविणार, कृषी विभागाकडून विशेष मोहीम

जिल्ह्यात ड्रॅगनफ्रूटचे क्षेत्र वाढविणार, कृषी विभागाकडून विशेष मोहीम

ड्रॅगनफ्रूट हे एक निवडुंग परिवारातील अत्यंत महत्वपुर्ण फळ असून भारतीय बाजारपेठेमध्ये या फळाची मागणी व पिकाचे क्षेत्र वाढत आहे. या फळाचे क्षेत्र मागणी, निर्यातक्षमता, औषधी व पोषक मूल्य इत्यादी बाबी लक्षात घेऊन फलोत्पादन विकास अभियानातुन ड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी प्रोत्साहन देण्याचे धोरण शासनाने निश्चित केले आहे. ड्रॅगनफ्रूट या फळामध्ये अधिक प्रमाणात उपलब्ध असणारे पोषकतत्व आणि ॲन्टीऑक्सीडंटमुळे या फळास सुपर फ्रूट म्हणून प्रसिद्धी मिळत आहे. या व्यतिरिक्त या फळामध्ये फॉस्फरस व कॅल्शियम यासारखे मिनरल्स अधिक प्रमाणात आढळतात. पाण्याची टंचाई निर्माण झाली तरी ही झाडे कायमची टिकून राहतात. तसेच या पिकाला रोग व किडींचा प्रादुर्भाव नगण्य असून पीक संरक्षणावर जास्त खर्च येत नाही.

ड्रॅगनफ्रूट फळपिकांची लागवड करण्यासाठी लागवड साहित्य, आधार पद्धत, ठिबक सिंचन, संरक्षण याबाबीकरीता अनुदान देय असून याकरीता चार लाख प्रति हेक्टर प्रकल्पमूल्य ग्राह्य धरुन ४० टक्के रक्कम १ लाख ६० हजार अनुदान तीन वर्षात या प्रमाणात देण्यात येते. दुसऱ्या वर्षी ७५ टक्के व तिसऱ्या वर्षी ९० टक्के झाडे जिवंत असणे अनिवार्य आहे. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नंदुरबार यांनी केले आहे.

Web Title: Dragonfruit area to be increased in the district, a special campaign by the Department of Agriculture