शहरं
Join us  
Trending Stories
1
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
4
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
5
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
6
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
7
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
8
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
9
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
10
दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे ॲटलीच्या 'राका'मध्ये दीपिका पादुकोणची सीन्स कट? मेकर्सने दिलं स्पष्टीकरण
11
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
12
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
13
ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता गरजेची; भारताने होर्मुझ संकटातून धडा घ्यावा, अनिल अग्रवाल यांचे सुचक विधान
14
Divyanka Sirohi : भावाने दरवाजा लावायला सांगितला, परत येऊन पाहिलं तर...; अभिनेत्री दिव्यांका सिरोहीच्या मृत्यूची Inside Story
15
IRCTC: रेल्वे पॅन्ट्रीत कीटक-उंदरांचा वाढता उपद्रव; प्रवाशांच्या तक्रारींनंतर प्रशासनाकडून दखल
16
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
17
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
18
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
19
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
20
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
Daily Top 2Weekly Top 5

खावटी कामासाठी कर्मचाऱ्यांना वेठीस धरून त्यांच्या जीवाशी खेळू नका,सर्वेक्षणानुसार सरसकट खावटीच्या लाभ द्या,भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. शशिकांत वाणी यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:27 IST

याबाबत देण्यात आलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, मागील आठ ते दहा महिन्यांपासून खावटी अनुदान योजनेची कार्यवाही संथगतीने ...

याबाबत देण्यात आलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, मागील आठ ते दहा महिन्यांपासून खावटी अनुदान योजनेची कार्यवाही संथगतीने सुरू असून अद्यापपर्यंत आदिवासीना त्याचा लाभ प्रत्यक्षात मिळालेला नाही. आता आदिवासीनी खावटी अनुदान योजनेचा लाभ मिळेल याची आशा सोडून दिलेली आहे. ही योजना मोठ्या प्रमाणात कारकुनी व कागदपत्राच्या कचाट्यात सापडली असून लाभार्थ्यांकडून अनावश्यक असणारी कागदपत्रे जमा करण्याचा ससेमिरा लावला आहे.

या सर्व बाबींना आदिवासी देखील मोठ्या प्रमाणात कंटाळले आहेत. आता नव्याने आश्रमशाळा कर्मचाऱ्यांना पुन्हा गावागावांमध्ये जाऊन लाभार्थ्यांचे जातीचे दाखले किंवा जातीच्या दाखल्या संबंधित सक्षम अधिकाऱ्यांची दाखले गोळा करणे, तसेच तलाठी, ग्रामसेवक यांच्याकडील उर्वरित कारवाई करून घेण्याबाबत आदेश आपल्या स्तरावरून देण्यात आले आहेत. परंतु सध्या ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात झाला आहे. या पार्श्वभूमीवर आश्रमशाळा कर्मचाऱ्यांना गावागावांमध्ये जाऊन लाभार्थ्यांकडून अशाप्रकारे कागदपत्र जमा करून घेण्याची कार्यवाही करायला लावणे, हे त्यांच्या जीवाशी खेळण्याबरोबर आहे. ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव झाल्यामुळे हे काम करत असताना एखादा कर्मचारी कोरोना बाधित झाला तर त्याचे सर्व कुटुंबीय धोक्यात येऊ शकतात, अशी भीती निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.

दरम्यान, या उलटदेखील परिस्थिती अशीच असून खावटीचे कामकाज करणारे अनेक शिक्षकदेखील कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेले आहेत. अनेक शिक्षकांच्या कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. काहींनी स्वॅब दिले असून या पार्श्वभूमीवर त्यांना गावागावात जाऊन कागदपत्ो गोळा करायला लावणे म्हणजे अप्रत्यक्षपणे कोरानाचा प्रचार-प्रसार करायला प्रवृत्त करण्यासारखे आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

काही ठिकाणी शिक्षक हे ग्रामीण भागात जाऊन खावटीचे काम करत असल्याने त्यांना ग्रामीण भागातील विरोधाला सामोरे जावे लागत आहे. अनेक गावात त्यांना प्रवेश दिला जात नसल्याची बाब समोर आली आहे. आदिवासी बांधवांना खावटी योजनेचा लाभ मिळावा, हीच सर्वांची भूमिका असून प्रशासन मात्र कागदी घोडे नाचविण्यात व्यस्त असल्याचा आरोप त्यांनी निवेदनातून केला आहे. जास्त कागदपत्रांच्या भानगडीत न पडता आजच्या प्रतिकूल परिस्थितीत तरी आदिवासीना आतापर्यंत झालेल्या सर्वेक्षणानुसार सरसकट खावटी अनुदान योजनेच्या लाभ देण्यात यावा व कागदपत्रे मिळविण्यासाठी विनाकारण कर्मचाऱ्यांना व लाभार्थ्याना वेठीस धरून त्यांच्या जीवाशी खेळू नये, अशी मागणी निवेदनाद्वारे भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. शशिकांत वाणी यांनी प्रकल्प अधिकाऱ्यांकडे केली आहे.