शहादा जायंट्स ग्रुपतर्फे डॉक्टरांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:21 IST2021-07-02T04:21:10+5:302021-07-02T04:21:10+5:30

कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतरत्न डॉ. बिधानचंद्र रॉय यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी रवींद्र जमादार, तर प्रमुख अतिथी म्हणून फेडरेशनचे ...

Doctor honored by Shahada Giants Group | शहादा जायंट्स ग्रुपतर्फे डॉक्टरांचा सन्मान

शहादा जायंट्स ग्रुपतर्फे डॉक्टरांचा सन्मान

कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतरत्न डॉ. बिधानचंद्र रॉय यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी रवींद्र जमादार, तर प्रमुख अतिथी म्हणून फेडरेशनचे माजी अध्यक्ष आर. टी. पाटील, माधव पाटील, फेडरेशनच्या उपाध्यक्षा संगीता पाटील, फेडरेशन डायरेक्टर कैलास भावसार, फेडरेशन अधिकारी माणक चौधरी, जायंट्सचे अध्यक्ष भूषण बाविस्कर, सचिव प्रमोद सोनार, सहेलीच्या अध्यक्षा दीपाली बाविस्कर, सचिव आशा चौधरी, इस्माईल राजा, ज्येष्ठ सदस्य दिलीप छगन पटेल, गणेश पाटील, नरेंद्र पटेल, अंबालाल पाटील, के. के. सोनार, अर्चना सोनार, तस्मिन व्होरा, नीलेश सोनार, आदी उपस्थित होते.

यावेळी कोरोना काळात उत्कृष्ट कार्य करणारे डॉ. स्मिता जैन, डॉ. राजेश जैन, डॉ. जगदीश पाटील, डॉ. अतुल शहा, डॉ. एच. एम. पाटील, हैदर व्होरा यांचा सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. रवींद्र जमादार, आर. टी. पाटील, माधव पाटील, संगीता पाटील, माणक चौधरी, कैलास भावसार, डॉ. जगदीश पाटील, डॉ. स्मिता जैन यांनी मनोगत व्यक्त केले. भूषण बाविस्कर यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी जायंट्सच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Doctor honored by Shahada Giants Group