जिल्ह्याला मिळाल्या पुन्हा पाच नवीन रुग्णवाहिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:37 IST2021-02-17T04:37:39+5:302021-02-17T04:37:39+5:30

यावेळी बोलताना डॉ. भारुड म्हणाले, आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. सामाजिक ...

The district got five new ambulances again | जिल्ह्याला मिळाल्या पुन्हा पाच नवीन रुग्णवाहिका

जिल्ह्याला मिळाल्या पुन्हा पाच नवीन रुग्णवाहिका

यावेळी बोलताना डॉ. भारुड म्हणाले, आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. सामाजिक दायित्व निधीतून यापूर्वी ११ रुग्णवाहिका देण्यात आल्या असून या ५ रुग्णवाहिकांमुळे ग्रामीण भागातील रुग्णांना चांगली सेवा देता येईल. दुर्गम भागातील तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनाही चांगले वाहन देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्य सेवेसाठी माझगाव डॉक तर्फे यापुढे देखील सहकार्य करण्यात येईल, असे पांड्या यांनी यावेळी सांगितले. आज प्राप्त झालेल्या ५ रुग्णवाहिकांसाठी माझगाव डॉककडून ५२ लाख ५० हजाराचा निधी प्राप्त झाला होता. यापूर्वी १ कोटी २४ लाख खर्च करून ११ रुग्णवाहिका घेण्यात आल्या आहेत. या रुग्णवाहिकांमुळे रुग्णांची वाहतूक करण्यास मदत होणार आहे. दोन शववाहिन्यादेखील मंजूर करण्यात आल्या असून त्या येत्या काळात प्राप्त होणार आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

Web Title: The district got five new ambulances again