तळोदा तालुक्यातील बचत गटातील महिलांना भाजीपाला बियाणे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:32 IST2021-07-28T04:32:00+5:302021-07-28T04:32:00+5:30

यावेळी मान्यवरांनी उपस्थितांना पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण करून त्यांचे संगोपन करण्याचे आवाहन केले. दरम्यान, खरवड येथे व्यापारी गाळ्यांचे जिल्हा ...

Distribution of vegetable seeds to women from self help groups in Taloda taluka | तळोदा तालुक्यातील बचत गटातील महिलांना भाजीपाला बियाणे वाटप

तळोदा तालुक्यातील बचत गटातील महिलांना भाजीपाला बियाणे वाटप

यावेळी मान्यवरांनी उपस्थितांना पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण करून त्यांचे संगोपन करण्याचे आवाहन केले. दरम्यान, खरवड येथे व्यापारी गाळ्यांचे जिल्हा परिषद अध्यक्षा ॲड. वळवी यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले. यानंतर जिल्हा परिषद अध्यक्षा ॲड. वळवी यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात सभा घेण्यात आली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर माजी मंत्री ॲड. पद्माकर वळवी यांनी सांगितले की, माझ्या स्वत:च्या नर्सरीतून २५ लाख बांबूच्या रोपांचे वाटप करण्यात येणार असून, त्याची सुरुवात खरवड गावापासून करण्यात आल्याचे सांगितले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा ॲड. वळवी यांनी सांगितले की, ग्रामविकास उपक्रमांतर्गत खरवड ग्रामपंचायतीने व्यापारी गाळे बांधल्याने या गाळ्यांच्या माध्यमातून ग्रामपंचायतीच्या उत्पन्नातदेखील वाढ होणार आहे, तसेच अंगणवाडीच्या परिसरात लावण्यात आलेल्या वृक्षांचे ग्रामस्थांनी संगोपन करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष प्रवीण वळवी, निशा वळवी, खरवडचे सरपंच विजाबाई मोरे, उपसरपंच वंदनाबाई गोसावी, तळोदा पंचायत समितीचे माजी उपसभापती नंदूगीर गोसावी, नरहर ठाकरे, दिवाकर पवार, जिल्हा परिषद सदस्या पार्वताबाई गावीत, प्रल्हाद भारती, डॉ. पुंडलिक राजपूत, जितेंद्र पाडवी, सीताराम राहासे, सचिन राहासे, गुलाबसिंग गिरासे, पुरुषोत्तम चव्हाण, रघुसिंग वळवी, भगवान चौधरी आदी उपस्थित होते. यावेळी कोविड नियमावलीचे पालन करण्यात आले.

Web Title: Distribution of vegetable seeds to women from self help groups in Taloda taluka