शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
3
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
4
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
5
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
6
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
7
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
8
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
9
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
10
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
11
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
12
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
13
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
14
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
15
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
17
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
18
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
19
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
20
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
Daily Top 2Weekly Top 5

तोरणमाळ पठाराच्या 300 मिटर अंतरावावरच मजुरांवर काळाचा घाला, जीव वाचवण्यासाठी अनेकांनी मारल्या उड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 12:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा/ब्राम्हणपुरी : खडकी गावाचा तीव्र चढाव चढून अवघ्या ३०० ते ४०० मिटरवर असलेल्या तोरणमाळ पठाराच्या अलीकडे ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा/ब्राम्हणपुरी : खडकी गावाचा तीव्र चढाव चढून अवघ्या ३०० ते ४०० मिटरवर असलेल्या तोरणमाळ पठाराच्या अलीकडे वाहनाचा ब्रेक निकामी झाल्याने वाहन उतारावर घसरू लागले. काहींनी वाहनातून उड्या मारल्या, परंतु आत बसलेल्यांना ती संधी न मिळाल्याने वाहन खोल दरीत कोसळून सहाजणांना आपला जीव गमावाव लागला. तर १८ जणांना जायबंदी व्हावे लागले. ५०० फूट खोल दरीत जखमी विव्हळत पडल्याने व मदतीसाठी आर्त हाक मारत असल्याने दरीचा परिसरात हाकाकार उडाला होता. हे सर्व मजूर खडकी, ता. धडगाव येथून रोजगारासाठी गुजरात राज्यातील साखर कारखान्यात जाणार होते. शनिवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास एका पांढऱ्या रंगाच्या जीपमध्ये ३० प्रवासी बसले. प्रवास सुरू झाल्यानंतर तोरणमाळ-खडकी या दोन गावांना जोडणाऱ्या रस्त्यावर जीप आली असता तोरणमाळ येथील खडकी पॉइंटपासून अवघ्या २०० मीटर अंतरावर जीप सुमारे ४०० ते ५०० फूट खोल दरीत कोसळली. यात सहा प्रवासी जागीच मृत झाले असून अनेक गंभीर झाले आहेत. विशेष म्हणजे प्रवाशांनी खचाखच भरलेली ही जीप दरीत कोसळण्यापूर्वी अनेकांनी गाडीबाहेर उड्या मारल्याने त्यांचा जीव वाचला.तोरणमाळ येथील खडकी पॉइंटपासून सुमारे २०० मीटर अंंतरावरील घाटरस्त्यात तीव्र चढाव आहे. एका वळणावर वाहनचालकाचा ताबा सुटल्याने ही जीप खोल दरीत प्रचंड वेगाने पडली. या अपघातात जीपगाडीचे पूर्ण नुकसान झाले असून चारही बाजूने गाडी पूर्णपणे   उलटल्याने फुटली आहे. जीपचे इंजिन, दरवाजे व इतर स्पेअर पार्ट अस्ताव्यस्तपणे आजूबाजूला पडले होते. अपघाताची भीषणता एवढी भयावह होती की, संपूर्ण दरीतून जखमी प्रवाशांच्या किंकाळ्या, आरडाओरड व रडारडीमुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.खडकी गावातून सकाळी सात वाजता निघाल्यानंतर खडकी पॉइंटजवळ अवघ्या काही मिनिटात हे सर्व प्रवासी पोहोचणार होते. खडकी पॉइंट येथून तोरणमाळपर्यंत    सपाटीचा रस्ता आहे. मात्र त्यापूर्वीच जीप घाटात कोसळली व काळाने या सर्वांवर घाला घातला. अपघातातून बचावलेल्या प्रवाशांनी खडकी पॉइंट ते तोरणमाळ असे सुमारे दोन किलोमीटर अंतर पायी पळत जाऊन तोरणमाळ गावात पोहोचल्यानंतर तेथील नागरिकांना अपघाताची माहिती दिल्यानंतर तोरणमाळचे माजी सरपंच पहाडसिंग नाईक, जयसिंग चौधरी, जीवन रावताळे, करमसिंग चौधरी,  सायसिंग रावताळे व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले.अतिशय खोल दरी असल्याने येथील जखमी व मृत प्रवाशांना दरीतून वर आणण्यासाठी बचाव पथकाला मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागली. कुठलीही साधन सुविधा नसताना तोरणमाळच्या ग्रामस्थांनी वनविभाग, आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांसह पोलीस कर्मचाऱ्यांनी मिळेल ते साधन साहित्याचा वापर करून जखमींना दरीतून बाहेर काढले व मृत प्रवाशांचे पार्थिव बाहेर  काढले. त्यानंतर आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात     आले.