शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

भविष्य निर्वाह निधीचा एकही अर्ज निकाली न निघाल्याने नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:30 IST

कोरोना महामारीचा फटका सर्वांनाच बसला असून, त्यातून शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारीही अपवाद ठरले नाहीत. आजपर्यंत अनेक शिक्षक आणि त्यांच्या कुटुंबातील ...

कोरोना महामारीचा फटका सर्वांनाच बसला असून, त्यातून शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारीही अपवाद ठरले नाहीत. आजपर्यंत अनेक शिक्षक आणि त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. यामुळे आर्थिक घडी विस्कटल्यामुळे अनेक शिक्षक, शिक्षकेतर व सेवानिवृत्त कर्मचारी जीफीएफमधील काही रक्कम काढण्यासाठी शिक्षण विभागाकडे व आदिवासी विकास विभागाच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवित आहेत. कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर काहींनी मुला-मुलींचे लग्न, घराचे बांधकाम व इतर कामेही काढली आहेत. जीफीएफमधील पैसा वापरावा म्हणून अनेकजणांनी शिक्षण विभाग आणि प्रकल्पस्तरावर प्रस्ताव पाठविले आहेत. परंतु जीपीएफचे शालार्थ ‘टॅब’ गेल्या चार महिन्यांपासून बंद केल्याने हजारो प्रस्ताव पडून आहेत. चार महिन्यांपासून टॅब बंद असल्याने काहींनी या पैशाच्या भरवशावर केलेले नियोजनही कोलमडले आहे. शिक्षकांचे प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभाग असे तीन ‘पे युनिट’ आहेत. एका जिल्ह्यात महिन्यात १०० ते १५० अर्ज येतात. त्यानुसार ३६ जिल्ह्यांतून महिन्याला हजारो अर्ज येत असतात. मात्र १ एप्रिलपासून भविष्यनिर्वाह निधीचा एकही अर्ज निकाली न निघाल्यामुळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे शासनदरबारी याची त्वरित दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.

शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि पेन्शनर हे भविष्यातील तरतूद म्हणून जीपीएफ रकमेकडे पाहतात. शासनाने हा पैसा वळता होणाऱ्या जीपीएफच्या शालार्थ ‘टॅब’ बंद केल्याने आपल्या हक्काचा पैसा उचलता येत नाही. शासनाने त्यामुळे शिक्षकांचे व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह पेन्शनर कर्मचाऱ्यांचे आर्थिक शोषण थांबवावे.

- भरत पटेल, राज्याध्यक्ष, स्वाभिमानी शिक्षक शिक्षकेतर संघटना, महाराष्ट्र राज्य