कृत्रीम तलावच्या जागेबाबत नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 12:20 IST2020-08-27T12:20:43+5:302020-08-27T12:20:52+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पालिकेने गणेशमूर्ती विसर्जनासाठी तयार केलेल्या कृत्रिम तलावाच्या जागेबाबत गणेशभक्तांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. वाघेश्वरी चौफुलीला ...

Dissatisfied with the location of the artificial lake | कृत्रीम तलावच्या जागेबाबत नाराजी

कृत्रीम तलावच्या जागेबाबत नाराजी

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : पालिकेने गणेशमूर्ती विसर्जनासाठी तयार केलेल्या कृत्रिम तलावाच्या जागेबाबत गणेशभक्तांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. वाघेश्वरी चौफुलीला लागून बायपास रस्त्यावर नाल्याच्या बाजुला तलाव करण्यात आला आहे. त्या ठिकाणी जाण्यासाठी संपुर्ण घाणीतू वाट काढावी लागणार आहे. या जागेऐवजी दुसऱ्या जागी करावा अशी मागणी होत आहे.
गणेश विसर्जनासाठी पालिकेने चार ठिकाणी कृत्रीम तलाव करण्याचे नियोजन केले आहे. त्यात वाघेश्वरी चौफुलीनजीकचा एक तलाव आहे. हा तलाव नाल्याच्या बाजुला करण्यात आला आहे. या नाल्यात अनेकजण कचरा टाकतात. त्यात उरलेले मांस, कोंबडीचे पिसं यांचा देखील समावेश असतो. शिवाय या तलावार्पंत जाण्यासाठी रस्ता देखील चांगला नाही. परिसरात दुर्गंधी देखील कायम असते. अशा ठिकाणी कृत्रीम तलाव केल्याने भक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्या ऐवज जानता राजा चौक किंवा कल्याणेश्वर मंदीर परिसरात हा तलाव केल असता तर अनेकांना ते सोयीचे ठरले असते. शिवाय प्रसन्न वातावरणात बाप्पांना निरोप देण्याचे समाधा भक्तांना लाभले असते असेही बोलले जात आहे. त्यामुळे अनंत चतुदर्शीला तरी या तलावाची जागा बदलावी अशी मागणी भाविकांतर्फे करण्यात येत आहे.

Web Title: Dissatisfied with the location of the artificial lake