शहरं
Join us  
Trending Stories
1
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
2
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
3
हिमाचल-उत्तराखंडमध्ये जलप्रलय! मुसळधार पाऊस आणि गारपिटीने जनजीवन विस्कळीत; कोट्यवधींचे नुकसान
4
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
5
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
6
विशेष लेख: भगव्या बंगालमध्ये सगळ्यांना ‘भाकरी’ मिळेल का?
7
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
8
टिटवाळ्यात एक हजार चाळी बेकायदा, भूमाफियांकडे दुर्लक्ष; केडीएमसी महापालिकेसह पोलिसांचाही कानाडोळा
9
अन्वयार्थ: न्यायालय म्हणते, बोगस दिव्यांग ‘काळी मेंढरे’ सेवेतून हाकला !
10
लेख: शहरांनी सुरळीत धावण्यासाठी त्यांच्या पायांना कसली चाकं हवीत?
11
अग्रलेख: युद्धाच्या झळा, काटकसरीच्या कळा
12
युद्धाचा भडका उडणार? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा 'तो' प्रस्ताव फेटाळला, चिंता वाढली
13
मुंबईसह राज्यातील दुकाने, हॉटेल्स, मॉल्स २४ तास सुरू का नाहीत? उद्योग मंत्रालयाने निर्णय घेऊनही अंमलबजावणी नाही
14
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
15
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
16
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
17
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
18
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
19
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
20
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम समिती बदलाचा वाद अखेर उच्च न्यायालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 12:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा परिषदेच्या बांधकाम व अर्थ समितीच्या बदलाचा विषय उच्च न्यायालयात गेला आहे. सभापती अभिजीत ...

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हा परिषदेच्या बांधकाम व अर्थ समितीच्या बदलाचा विषय उच्च न्यायालयात गेला आहे. सभापती अभिजीत पाटील यांनी यासंदर्भात याचिका दाखल केली असून विषय समिती बदलाचा अधिकार सभापतींना नसल्याचे त्यांचे म्हणने आहे. अ‍ॅड.चंद्रकांत पाटील यांच्या वतीने त्यांनी ही याचिका दाखल केली आहे.
जिल्हा परिषदेचे सभापती अभिजीत पाटील यांच्याकडील बांधकाम व अर्थ समिती काढून घेत ती उपाध्यक्ष अ‍ॅड.राम रघुवंशी यांच्याकडे तर रघुवंशी यांच्याकडील कृषी व पशुसंवर्धन समिती पाटील यांच्याकडे देण्याचा ठराव गेल्या महिन्यात झालेल्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला होता. या निर्णयाला आक्षेप घेत अभिजीत पाटील यांनी निर्णयाबाबत उच्च न्यायालयात जाण्याचे सुतोवाच केले होते. अखेर त्यांनी अ‍ॅड.चंद्रकांत पाटील यांच्या वतीने औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे.
याचिकेत म्हटले आहे की, विषय समितीच्या सभापतींची मुदत अडीच वर्षे असून कलम ८३ अन्वये सभापती म्हणून निवड झाल्यावर अडीच वर्षांची मुदत पूर्ण करेपर्यंत कोणताही बदल करता येत नाही. अधिनियमातंर्गत जिल्हाधिकाऱ्यांनी बोलावलेल्या बैठकीत एकदा विषय समितीचे सभापती म्हणून निवडल्यानंतर अडीच वर्ष विषय समितीचे अध्यक्ष असतात.
अधिनियम कलम १११ सत्तेचा वापर करून अडीच वर्षाच्या मुदतीच्या समाप्तीपूर्वी विषय समितीच्या सभापतीच्या वाटपामध्ये बदल करण्यास जिल्हा परिषदेला अधिकार नाही आणि ती सक्षम नाही. जिल्हा परिषद हे विषय समितीच्या अध्यक्षपदाबाबत सुधारणा किंवा बदल करण्याचे अधिकार नाही. त्यामुळे ३१ जुलैच्या बैठकीत जो बदल झालेला आहे तो रद्द करणे योग्य आहे. तसेच विषय समिती अध्यक्षपदाचा बदल सर्वसाधारण सभेत होऊ शकत नाहीत म्हणून देखील सदर ठराव पास झाला आहे तो रद्द करणे आवश्यक आहे.
३१ जुलैच्या बैठकीची नोटीस आवश्यक त्या प्रतीसह जारी करण्यात आलेली नव्हती. सदस्यांची चर्चा करण्यात आलेली आहे ते सुद्धा सदर नोटीसमध्ये नमूद केले नव्हते. अभिजित पाटील यांनी बैठक पुढे ढकलण्याची विंनती नाकारण्यात आली. बैठकीत कोणतीही प्रभावी चर्चा वादविवाद झाले नाहीत. म्हणून बैघकीतील या संदर्भातील झालेले कामकाज नियमाला धरून नसल्याने तो रद्द करावा असेही या याचिकेत नमुद केले आहे.