शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना व्यतिरिक्त इतर आजारांनी साडेपाच हजार नागरिक दगावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:31 IST

नंदुरबार : कोरोनामुळे जिल्ह्यात साधारण ६०० जणांचा बळी गेला आहे. यातून जिल्ह्याचा कोरोना मृत्यूदर हा १.८ टक्के असल्याचे वारंवार ...

नंदुरबार : कोरोनामुळे जिल्ह्यात साधारण ६०० जणांचा बळी गेला आहे. यातून जिल्ह्याचा कोरोना मृत्यूदर हा १.८ टक्के असल्याचे वारंवार स्पष्ट होत आहे. परंतु त्यासोबत जिल्ह्यात इतर आजारांनी दगावणाऱ्यांची संख्याही कमी नसल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यात एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या वर्षात साडेपाच हजार जणांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात एप्रिल २०२० मध्ये काेरोनाचा शिरकाव झाला होता. जुलै २०२० पर्यंत आटोक्यात असलेल्या कोरोनाने वेग पकडत ऑगस्ट महिन्यापासून मृत्यूची संख्या वाढण्यास सुरुवात झाली होती. यातून आजअखेरीस कोरोनामुळे ६३३ जणांचा मृत्यू झाला आहे. अद्यापही मृत्यूची ही मालिका सुरुच आहे. कोरोनाचा हाहाकार सुरू असताना विविध आजारांनी मृत होणाऱ्यांची संख्या मात्र मोठी असल्याचे दिसून आले असून वर्षभरात विविध आजारांनी ५ हजार ४९८ जणांचा जिल्ह्यात मृत्यू झाल्याच्या नोंदी आहेत.

आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात अतिसारामुळे तीन, क्षयरोगामुळे ६८, श्वसनाच्या विकारांनी २९१, तापजन्य आजाराने ५६, एचआयव्ही २५, कॅन्सर २०६, मेंदूविकाराने १८५, अपघातांमध्ये २४९, आत्महत्या २०१, जनावरांनी चावा घेणे व दंशाने ४२, तीव्ररोगांमुळे ३९९, हृदयविकाराच्या धक्क्याने ८०९ तर जुनाट आजारांनी सर्वाधिक १ हजार ७२७ अशा ५ हजार ५५९८ जणांचा जिल्ह्यात मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षापासून आढावा घेतल्यास प्रत्येक महिन्यातील मृत्यूचा आकडा हा अधिक असल्याचे दिसून आले आहे. यात २०२० च्या एप्रिल महिन्यात ४२५, मे ३८६, जून ३६३, जुलै ४४२, ऑगस्ट ५०६, सप्टेंबर ५५९, ऑक्टोबर ५४०, नोव्हेंबर ५१५ तर डिसेंबर महिन्यात ४७५ जणांचा मृत्यू झाला आहे. चालू जानेवारी महिन्यात ४७५, फेब्रुवारी ४५२ तर मार्च महिन्यात ४९६ जणांचा विविध आजारांनी मृत्यू झाला आहे. अनैसर्गिक पद्धतीने झालेल्या या मृत्यूच्या नोंदी आरोग्य विभागाकडे करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.